Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकजिल्हास्तरीय "भूमिका अभिनय व लोकनृत्य" स्पर्धा उत्साहात संपन्न.!

जिल्हास्तरीय “भूमिका अभिनय व लोकनृत्य” स्पर्धा उत्साहात संपन्न.!

Nagar Reporter
Online news Natwork

संगमनेर/अ.नगर: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जि. अहमदनगर यांचेद्वारे भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा नुकत्याच शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचे परीक्षण अधिव्याख्याता रामेश्वर लोटके ,सविता घुले (प्राचार्या अध्यापक विद्यालय संगमनेर), प्रशांत त्रिभुवन यांनी केले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्पर्धा समन्वयक अधिव्याख्याता डॉ. गणेश मोरे यांनी केले.
भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेसाठी जिल्ह्यातील दहा संघ सहभागी होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण संस्थेचे प्राचार्य अरुण भांगरे, शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेरचे प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे,अधिव्याख्याता कैलास सदगिर,ज्योती निंबाळकर यांच्या शुभहस्ते पार पडले. सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरुप होते.

दोन्ही स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे

भूमिका अभिनय स्पर्धा–
प्रथम क्रमांक-मुलींची शासकीय निवासी शाळा मांडवगण ता. श्रीगोंदा. द्वितीय क्रमांक- शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पळसुंदे ता. अकोले तृतीय क्रमांक-शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा पैठण ता. अकोले.

लोकनृत्य स्पर्धा-
प्रथम क्रमांक-मुलींची शासकीय निवासी शाळा मांडवगण.

द्वितीय क्रमांक– शासकीय आश्रम शाळा सावरचोळ ता. संगमनेर
तृतीय क्रमांक– शासकीय माध्यमिक आश्रम शाळा साकूर ता. संगमनेर.

दोन्ही गटातील प्रथम पारितोषिकप्राप्त संघाची निवड पुणे विभागिय स्पर्धांसाठी झाली आहे.

भूमिका अभिनय स्पर्धेसाठी निरोगी वाढ, पौष्टिक आहार व आरोग्य,वैयक्तिक (शारीरिक,मानसिक,भावनिक,लैंगिक सुरक्षा),इंटरनेटचा सुरक्षित वापर ,मिडिया साक्षरता,अंमली पदार्थांचा गैरवापर-कारणे व उपाय हे विषय होते.

तर लोकनृत्य स्पर्धेसाठी मुले व मुली यांच्यात संधीची संमानता,मुलांच्या विकासात संयुक्त कुटुंबांची भूमिका,पर्यावरण संरक्षण,मादक द्रव्य सेवन प्रतिबंध असे विषय होते.

शासकीय शाळांतील कुमारवयीन विद्यार्थ्यांत समकालिन प्रश्नांविषयी सजगता निर्माण व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या स्पर्धा एनसीईआरटीमार्फत दरवर्षी आयोजित केल्या जातात.

👉संकलन-सोमराज बडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments