Monday, May 20, 2024
HomeUncategorizedमंदिरात चोरी करणारा पकडला ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

मंदिरात चोरी करणारा पकडला ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
जगदंबा माता मंदिरात चोरी करणारा पकडण्यात नगर तालुका पोलिसांनी यश आले आहे. चोरट्याकडून मंदिरातील देवीच्या गळयातील सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप, पोउपनि. युवराज चव्हाण, पोहेकॉ धर्मनाथ पालवे, पोहेकॉ शैलेश सरोदे, पोहेकॉ सतिष थोरात, पोना बाळू कदम, चालक पोकॉ विठ्ठल गोरे आदिंच्या पथकाने कारवाई केली आहे.

नगर तालुका पो.स्टे. I गुरनं. ३८२ / २०२२ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी पोपट सोन्याबापू चेमटे (वय ५०, रा. खांडके ता. जि. अहमदनगर) यांनी खांडके गावातील जगदंबा मातेच्या गळयामधे असणारे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले असल्याबाबत फिर्याद दिली होती. त्याचा तपास नगर तालुका पोलीस ठाणे कडून सुरु होता. दि. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सपोनि राजेंद्र सानप यांना चोरी ही सुभाष दशरथ पवार (रा. पवार तांडा, कौंडगाव ता. जि. अहमदनगर) याने केली असल्याची माहिती मिळाली. सोनिया सानप यांनी पथकामार्फत सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने सोन्याचे चोरी केलेले मंगळसूत्र हे दौलावडगाव (ता. आष्टी जि.बीड )येथील सोनाराकडे गहाण ठेवले असल्याचे त्याने सांगितले. सोनार याने गहाण ठेवलेले मंगळसूत्र तात्काळ पोलीस ठाण्यास हजर केल्याने गुन्हयात मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments