Monday, May 20, 2024
HomeUncategorizedअहमदनगर शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त

अहमदनगर शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
शहरात तलवारी व छोट्या प्राण घातक हत्यारांची विक्री करणा-या आरोपी कडून २८ हजार ५०० रु.किं चा शस्त्रसाठा कोतवाली पोलीसांनी जप्त केला.
याबाबत समजलेली माहिती की, पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली कि, अहमदनगर शहरातील आशा टॉकीज चौक येथे आरीशा कलेक्शनमध्ये अवैध प्राणघातक हत्यारांची बेकायदेशीर विक्री होत आहे, अशी माहीती मिळाली. कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकासह जाऊन छापा टाकून दुकानाची झडती घेतली. या ठिकाणी हुमायुन उमर शेख (वय ३७, रा आशा टॉकीज चौक अहमदनगर) हा मिळून आला‌. त्याचे दुकानात काउंटर खालील भागात खालील प्रमाणे प्राणघातक हत्यारे मिळून आले. १९ हजार ५०० रु कि च्या ५ मोठ्या तलवारी, १ हजार रु किं चा फायवर मुठीचा धारदार चाकू, १ हजार रु कि चा मुठीतील फायटर धारदार चाकू, ७ हजार रु कि चे १४ नग धारदार चाकू असा एकूण २८ हजार ५०० कि. चे प्राणघातक शस्त्रे विक्री करणे कामी स्वताच्या कबज्यात बाळगताना मिळून आला. पोना योगश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं । ८२४ / २०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहेत.
जिल्हा पोलीस पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, सपोनि रविंद्र पिंगळे, सपोनि विवेक पवार, पोसई मनोज कचरे, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रियाज इनामदार, पोना योगेश खामकर, पोकों सुजय हिवाळे, पोकाँ अमोल गाढे, पोका संदिप थोरात, पोकों सोमनाथ राउत, पोहेकाँ सागर निपसे, पोना गोरख काळे, पोना इसराईल पठाण, पोहेकाँ सतिष भांड, पोकाँ प्रशांत बोरुडे, पोकों सतिष शिंदे, मपोकाॅ हिना बागवान आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments