Monday, May 20, 2024
Homeक्राईमचक्क मूतखड्याऐवजी काढली किडनी ; डॉक्टरांना ११ लाख नुकसान भरपाई...

चक्क मूतखड्याऐवजी काढली किडनी ; डॉक्टरांना ११ लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश

चक्क मूतखड्याऐवजी काढली  किडनी ;  डॉक्टरांना ११ लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

एका डॉक्टरांनी रुग्णाच्या मुतखड्यावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी चक्क रुग्णाची किडनी काढून घेतल्याचा भयावह घटना घडली आहे. या घटनेत त्या संबंधित रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. या चुकीच्या शस्त्रक्रियेची तक्रार  संबंधितांनी ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे केली, या घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने  रुग्णालय प्रशासनाला मयत रुग्णाच्या कुटुंबियांना ११.२३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही धक्कादायक घटना गुजरात येथे घडली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, खेडा जिल्ह्यातील वांघ्रोली येथील देवेंद्रभाई रावल यांना पाठदुखी आणि लघूशंकेसाठी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी बालसिनोर येथील केएमजी रुग्णालयातील डॉ. शिवूभाई पटेल यांच्यासोबत उपचारांसाठी संपर्क साधला. मे २०२१ मध्ये त्यांच्या किडनीमध्ये १४ मिमीचा मूतखडा असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. यावेळी त्यांनी चांगले उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी त्यांनी शस्त्रक्रिया करुन मूतखडा काढण्याला पसंती दिली. यानंतर सप्टेंबर २०११ मध्ये त्यांच्या किडनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या चुकीमुळे मूतखड्याऐवजी किडनी बाहेर काढल्य़ाचे कुटुंबियांच्या लक्षात आले.
कुटुंबियांना हा प्रकार ऐकून मोठा धक्का बसला. यावेळी रुग्णाला लघूशंकेवेळी आणखी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना किडनी स्पेशल रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी त्यांना अहमदाबाद येथील आयकेडीआरसी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु त्या रुग्णालयातच उपचारांदरम्यान दि.८ जानेवारी २०१२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
देवेंद्रभाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित रुग्णालयालविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण ग्राहक न्यायालयात पोहचले. न्यायालयाने संबंधित रुग्णालयाला यात दोषी असल्याचे जाहीर केले. तसेच संबंधिक रुग्णालयाने मृत्यू रुग्णाच्या कुटुंबियांना ११.२३ लाख रुपये नुकसाना भरपाई देण्याचे आदेश दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments