Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हापो.बाळासाहेब नागरगोजे यांना जीवन रक्षा पदक प्रदान ; पोलिस दलातून अभिनंदनाचा वर्षाव

पो.बाळासाहेब नागरगोजे यांना जीवन रक्षा पदक प्रदान ; पोलिस दलातून अभिनंदनाचा वर्षाव

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-
जिल्ह्यातील नेवास पोलीस ठाण्यातील पोलिस शिपाई बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना शौर्य व धाडसाबद्दल  राष्ट्रपती यांचे शिफारशीने केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी त्यांना सन २०२० करीता ” जीवन रक्षा पदक प्रदान केलेले आहे. या पदकामध्ये जीवन रक्षा पदक- १, प्रमाणपत्र, जीवन रक्षा पदक (सुक्ष्म) १, आणि रोख रक्कम रु. १ लाख रुपये प्रदान करण्यात आले आहे,  अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.


दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते ही सर्व पदक व रोख रक्कम ही पोलिस शिपाई बाळासाहेब नागरगोजे यांना देऊन श्री पाटील यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री पाटील पुढे म्हणाले की, दि.१२ डिसेंबर २०१८ रोजी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिस शिपाई बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे (नेवास पोलीस ठाणे) हे दैनदिन कर्तव्य बजावत होते. यावेळी  एका अज्ञात व्यक्तीने फोन केला की, प्रवरा नदीपात्रातील पुलावरून एक महिला पाण्यात पडली आणि बुडत आहे. ही माहिती मिळताच श्री. नागरगोजे यांनी आपल्या वरिष्ठांना कळवले.  नेवासा पोलीस ठाणे पासून  १०० मीटर अंतरावर प्रवरा नदीच्या पुलाच्या ठिकाणी धाव घेतली, लगेचच जीवाची पर्वा नकरता प्रवाहात उडी मारली. नदीच्या प्रवाहाच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने महिलेला किनाऱ्यावर नेणे शक्य नव्हते. श्री. नागरगोजे यांनी महिलेला दोन ते तीन वेळा किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याच्या अतिप्रवाहामुळे तो स्वतः बुडू लागला. त्यांनी अथक प्रयत्नाने बुडणाऱ्या व्यक्तीसोबत एकट्याने किना-यापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने शेवटी श्री. नागरगोजे यांनी पुलाखालील खांबाजवळ उगवलेल्या गवताला एक हाताने व महिलेला एक हताने घट पकडून ठेवण्यात त्यांना यश आले. बऱ्याच कालावधीनंतर गावातील एक तरुण आकाश शेटे यांने श्री. नागरगोजे यांचे मदतीसाठी एक चप्पू पाठविला, त्यांनी मोठ्या शिताफीने  महिलेस चप्पुवर ढकलून स्वत: पेंडल मारुन किना-यावर आणले व पुढील उपचारासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. श्री. नागरगोजे यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे बुडणा-या महिलेचा जीव वाचू शकला. या श्री. नागरगोज यांनी केलेल्या या शौर्य व धाडसाबद्दल राष्ट्रपती यांच्या शिफारशीने केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी त्यांना सन २०२० करीता ” जीवन रक्षा पदक प्रदान केलेले आहे.
सध्या शेवगाव पोलिस ठाण्यात असणारे पोलिस शिपाई  श्री. नागरगोजे यांच्या या शौर्य व धाडसी कामगिरीबद्दल राज्यातील पोलिस प्रशासनातून अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments