Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाअहमदनगर शहरात सहा चोरटे जेरबंद ; कोतवाली,तोफखाना पोलीसांची संयुक्त कारवाई

अहमदनगर शहरात सहा चोरटे जेरबंद ; कोतवाली,तोफखाना पोलीसांची संयुक्त कारवाई

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर –
शहरात सोमवारी (दि. 25) दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास सहा चोरट्यांना जुन्या बसस्थानका समोरील अंबर प्लाझा इमारतीतील एचडीएफसी बँकेसमोर पकडण्यात कोतवाली व तोफखाना पोलिसांना यश आले आहे. अजून काही चोरट्यांचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख श्री कचरे यांनी दिली.

याबाबत समजलेली माहिती अशी की कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत यापूर्वी काही चोराच्या घटना घडल्या होत्या या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती या शोध मोहीम दरम्यान सोमवारी दिनांक 25 एक ते दीड वाजण्याच्या सुमारास नगर शहरात अंबर प्लाझा परिसरात काही चोरटे दरोडा घालण्यासाठी येत असल्याची माहिती खबर यामार्फत पोलिसांना मिळाली होती या अनुषंगाने कोतवाली व तोफखाना पोलिसांनी शोध मोहीम घेऊन माळीवाडा बसस्थानक परिसरात सापळा लावण्यात आला यावेळी चोरटे जिल्हा बँका शेजारील एचडीएफसी बँकेसमोर दिसली यावेळी तोफखाना व कोतवाली पोलिसांनी मोठ्या शेतीने या सहा चोरट्यांना पकडण्यात यश मिळवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments