Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाडॉक्टर अमोल जाधव यांचे करोना काळातील कार्य कौतुकास्पद - श्रीनिवास बोज्जा

डॉक्टर अमोल जाधव यांचे करोना काळातील कार्य कौतुकास्पद – श्रीनिवास बोज्जा

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर –
डॉक्टर अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉक्टर अमोल जाधव यांनी करोनाच्या काळामध्ये भरीव समाजोपयोगी कामे केलेले असून त्यांच्या कामाची पावती म्हणूनच फटाका असो सेने त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगर कल्याण रोड वरील  होलसेल फटाका मार्केट मध्ये फटाका असोशियन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व सचिव संतोष बोरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना असोशियन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले करोनाच्या काळामध्ये डॉक्टर अमोल जाधव यांनी कोविड सेंटर गोरगरिबांसाठी उपलब्ध करून दिले या सेंटर मार्फत अनेक अनेक रुग्णांना बरे केले. सदरचे काम अत्यंत निस्वार्थी पणे त्यांनी केली असल्याने त्यांचा अभिमान असोसिएशनला आहे यावेळी असोसिएशनचे सचिव संतोष बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना डॉक्टर अमोल जाधव म्हणाले हा सत्कार माझ्या कुटुंबाच्या वतीने करीत आहेत असे मी समजतो असोसिएशनच्या सत्कारामुळे मला नक्कीच ऊर्जा मिळेल मी यापुढेही निस्वार्थपणे काम करण्याचा प्रयत्न करील. या ठिकाणी असोशियेशनने मला जो मान सन्मान दिला  या बद्दल मी मनापासून आभार मानतो.
यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष सोमा रोकडे सहसचिव अरविंद साठे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, जयप्रकाश बोगावत, संतोष वल्ली विकास पटवेकर गणेश परभणे, अनिल तकले अमोल तोडकर उमेश शिरसागर अरविंद काळे देविदास ढवळे मयुर भापकर  संतोष तोडकर दाजी गारकर उबेद अमानुल्ला खान विजय मुनोत संजय सुराणा सागर हरबा आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत उमेश क्षीरसागर  यांनी केले तर आभार अरविंद साठे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments