Monday, May 20, 2024
Homeविशेष बातम्यापाथर्डी सुपूत्र फायटर पायलट प्रसाद बडेंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले

पाथर्डी सुपूत्र फायटर पायलट प्रसाद बडेंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले

अशोक बडे
Nagar Reporter
Online news Natwork
पाथर्डी
: तालुक्यातील अनेक मुले – मुली देशाच्या सर्व भागात सर्व क्षेत्रात विविध प्रकारची चांगल्या प्रकारची सेवा बजावतात. यामध्ये अजून एका तरुण तडफदार फायटर पायलटची भर पडली त्यामुळे पाथर्डी तालुक्यात तरुण वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला असून बरोबरच देश सेवेची शपथ देण्यात आली. पूर्वेला असलेल्या भिलवडे गावातील कॅप्टन दिनकर नाथा बडे यांचा मुलगा फायटर पायलट प्रसाद दिनकर बडे याने घवघवीत असे यश संपादन केले आहे. फायटर पायलट प्रसाद दिनकर बडे (वय 23) यांचे प्राथमिक ते मॅकेनिकल इंजिनिअरींग पर्यंतचे शिक्षण पुणे येथील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये झाले.

मॅकेनिकल इंजिनिअरींग नंतर एअर फोर्समध्ये परिक्षा देऊन उत्तीर्ण झाला. जानेवारी 2022 मध्ये हैदाराबाद येथील भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग ॲकडमीत ट्रेनिंग सुरू झाली. त्याने 17 जुन 2023 ला यशस्वीरीत्या ट्रेनिंग पूर्ण केले. 17 रोजी भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फाईटर पायलट पदी गौरविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments