Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकजि.प.प्रा.शाळेच्या विद्यार्थ्यांनी गिरवले कोडींगचे धडे...!

जि.प.प्रा.शाळेच्या विद्यार्थ्यांनी गिरवले कोडींगचे धडे…!

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे पाथर्डी :पाथर्डी तालुक्यातील जि. प. प्रा. केंद्र शाळा पिंपळगाव तप्पा येथे लिडरशिप फाॕर इक्विटी या संस्थेमार्फत codes on wheels या उपक्रमांतर्गत दोन दिवशीय कोडिंग कार्यशाळेचे आयोजन वार रविवार(ता.१०) ते सोमवार (ता.११)रोजी करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर प्रोग्रॕम निर्मिती याविषयी संस्थेच्या प्रीती मेश्राम मॅडम यांनी अतिशय सविस्तर ,सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः स्टोरी बनवून त्याचे सादरीकरण केले. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी हुशार व कार्यतत्पर आहेत.,असे विद्यार्थ्यांचे कौतुक त्यांनी याप्रसंगी केले.


या कार्यक्रमासाठी पिंपळगाव तप्पा केंद्राचे केंद्रप्रमुख निलेश वराडे, अंबादास सोनपुरे,तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर वाघमारे, संपत दराडे, किसन शिरसाट, गणेश शिरसाट, रघूनाना शिरसाट,मनीषा शिरसाट, भीमा घुले, लताबाई शिरसाट, साळवे ताई, इतर सर्व सदस्य,ग्रामस्थ,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शाळेचे मुख्याध्यापक भास्कर दराडे यांनी प्रास्ताविक केले. तर मंगल खेडकर, गीता गाडेकर,अनिता गायकवाड,संतोष गिरी यांनी कार्यशाळा आयोजन करण्यास विशेष परिश्रम घेतले.
शाळेतील विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचा अध्ययन प्रकार अनुभवण्यास मिळाल्याबद्दल पिपंळगाव ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments