Monday, May 20, 2024
Homeविशेष बातम्याचोंडी येथून दि.९ फेब्रुवारीला नामांतर रथयात्रेस प्रारंभ ; पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर नगर...

चोंडी येथून दि.९ फेब्रुवारीला नामांतर रथयात्रेस प्रारंभ ; पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समिती

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समिती च्या वतीने नगर जिल्ह्याला पुण्यश्लो अहिल्यादेवी होळकर नगरची अंमलबजावणी करण्यासाठी दि. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजत चोंडी या ठिकाणाहून नामांतर रथयात्रेचे उद्घाटन श्री परमपूज्य खेलोबा राजाभाऊ वाघमोडे उर्फ फरां महाराज श्रीक्षेत्र गुरुदेव देवस्थान पट्टणकलोडी (जि. कोल्हापूर) येथील मुख्य मानकरी व भाकणूकका हस्ते व श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थानचे पुजारी नारायण खानू मोठे देसाई यांच्या प्रमुख होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

नामांतर रथयात्रा ९ फेब्रुवारी २०२३ चोंडी येथून कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर शहर ते नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर २० फेब्रुवारी २०२३ रोजी महामोर्चाने सांगता होईल. नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली विधानसभेमध्ये या मागणीला उत्तर देताना राज्याचे मंत्री मा.दीपक केसरकर यांनी सरकार हे नाव देण्यासाठी अनुकूल आहे असे उत्तर दिले. तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीही सकारात्मकता दर्शविली व सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोस्ट विभाग, यांना पत्र पाठवून स्थानिक पातळीवरून सहमती दर्शक ठराव राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या. परंतु याच कालावधीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नामांतरापेक्षा विभाजन व विकास महत्त्वाचा आहे. हा मुद्दा पुढे करून नामांतराच्या विषयाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तसेच नामांतराची मागणी आणि स्थानिक जनतेकडून मागणी नाही अशी चर्चा सुरू केली. त्यामुळे या रथयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये जाऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करून ही मागणी लोकाभिमुख करण्यासाठी प्रबोधन केले जाणार आहे. व जिल्ह्यातील ग्रामपंचायत ठराव. खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचे नामांतराला पाठिंब्याचे पत्र घेतले जाणार आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या अखंड भारतातील कार्य माहितीपटाच्या माध्यमातून दाखविले जाणार आहे. तरी या नामांतर रथयात्रेसाठी सर्व अहिल्या प्रेमींनी उपस्थित राहावे. असे आव्हान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments