Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाकोतवाली पोलिस ठाणे परिसरातील शौचालयात अज्ञात व्यक्तीची आत्महत्या

कोतवाली पोलिस ठाणे परिसरातील शौचालयात अज्ञात व्यक्तीची आत्महत्या

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- 
कोतवाली पोलिस ठाणे परिसरातील शौचालयामध्ये एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याचे बुधवारी (दि.२०) सकाळी निर्दशनास आली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीजवळ ज्ञानेश्वर मराठे (ता.फलटण जि.सातारा) असे नाव असलेले ड्रव्हिंग ओळखपत्र मिळाले आहे.


कोतवाली पोलिस ठाण्याचे पो नि संपत शिंदे यांना
घटनेची माहिती समजताच घटनेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी  प्रभारी नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील हे कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी शौचालयाचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी त्याच्याकडे खिशात वाहनचालक ओळखपत्र हे नाव ज्ञानेश्वर मराठे (ता.फलटण जि.सातारा) असे असल्याचे सापडले आहे. या घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही कोतवाली पोलिस ठाण्यात सुरू होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments