Monday, May 20, 2024
Homeविशेष बातम्याखाजगी रुग्णालयात रुग्ण हक्कांची सनद लावा, अन्यथा परवाना रद्द : जिल्हा शल्यचिकित्सक

खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्कांची सनद लावा, अन्यथा परवाना रद्द : जिल्हा शल्यचिकित्सक

Nagar Reporter
Online Natwork
अहमदनगर :
जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्कांची सनद लावा, अन्यथा परवाना रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांनी काढला आहे.

कोरोना कालावधीत रुग्णांची झालेली आर्थिक फसवणूक लक्षात घेऊन केंद्र सरकार व मानव अधिकार आयोगाने रुग्ण हक्कांची सनद लावण्याचे आदेश दिले होते. यानंतर ही अहमदनगर जिल्हृयातील बहुतांश खाजगी रुग्णालये रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शणी भागात लावत नव्हते. या मुळे रुग्ण हक्कांचे उल्लंघन होत होते, या विषयाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे दि.९ फेब्रुवारी २०२३ ला तक्रार दाखल केली होती.


तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने या विषयी तात्काळ कार्यवाही करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना सुचित केले. या सूचनेवरुन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जा. क्र.जि.रु.ऊ/बॉम्बे नर्सिंग होम /10286-89/23 दि.02/06/23 हे पत्र निर्गमित केले.
आदेशात स्पष्ट केले की, जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालय चालकांना म्हटले आहे, वारंवार सूचना देऊन ही आपण रुग्ण हक्कांची सनद व दरपत्रकची माहिती दर्शनी भागात लावलेली दिसून येत नाही. माहिती दर्शनी भागात लावून तसा अहवाल कार्यालयास तात्काळ कळविण्यात यावा. आपण लावण्यात आलेली रुग्ण हक्कांची सनद व दर पत्रक दर्शनी भागात लावलेले फोटोसोबत जोडण्यात यावेत, अन्यथा आपल्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येईल याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments