Sunday, May 19, 2024
Homeअहमदनगर जिल्हासुरेश निकम टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई ; डिवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे तपास...

सुरेश निकम टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई ; डिवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे तपास वर्ग

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर  –
गंभीर गुन्हे दाखल असणा-या सुरेश निकम टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याचा पुढील तपास श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सुरेश निकम यांच्यासह टोळीतील सदस्य  विकास बाळू हनवत, करण शेलार, रोहित शिंदे, सागर जाधव ,सतीश अरुण बर्डे, विधी संघर्ष बालक आदिंवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सर्व आरोपींवर नगर एमआयडीसी व सोनई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


नगर जिल्ह्यात मालमत्ता विषयक  गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध असलेल्या सुरेश निकम टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.  एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी  ऋतिक प्रेमचंद  छजलानी यांनी Cr. No. 254/ 2021 IPC 395,120( ब )नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सुरेश निकम टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर.सुरेश निकम  सह टोळीतील अन्य 6 सदस्यांना अटक करण्यात आली होती. सुरेश निकम  टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर व ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments