Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकएम.एम.नि-हाळी विद्यालयात स्वातंत्र्य सेनानी कै.माधवरावजी नि-हाळी यांची जयंती साजरी.

एम.एम.नि-हाळी विद्यालयात स्वातंत्र्य सेनानी कै.माधवरावजी नि-हाळी यांची जयंती साजरी.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गजाननरावजी कोष्टी यांनी आपल्या अतिथी भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण हे एकलव्या प्रमाणे घेतले पाहिजे. गुरु असतील, नसतील आपल्या शिक्षणामध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे.. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले…

तसेच कै. माधवरावजी नि-हाळी यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले की , आप्पांनी आयुष्यभर निस्वार्थपणे आपले कार्य समाजासाठी केले आहे. त्यांचे कार्य समाजासाठी एक प्रेरणा आहे. तसेच माधवराव यांच्या कार्याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली.

यावेळी, विद्यालयाचे प्राचार्य श्री .संजय घिगे सर, विश्वस्त श्री. श्रीकांत नि-हाळी सर, पर्यवेक्षक- दत्तात्रय लवांडे, पंचायत समिती पाथर्डी. शिक्षण विभागाचे श्री. भांगरे साहेब तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश सरोदे यांनी केले ,तर कार्यक्रमाचे आभार श्री राधाकिसन कोठे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments