Monday, May 20, 2024
Homeविशेष बातम्याऊसतोड कामगार कै.मच्छिंद्र खाडे यांच्या कुटुंबियांना जोगेवाडी ग्रामस्थांसह मिञमंडळीकडून आर्थिक आधार

ऊसतोड कामगार कै.मच्छिंद्र खाडे यांच्या कुटुंबियांना जोगेवाडी ग्रामस्थांसह मिञमंडळीकडून आर्थिक आधार



ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर –
जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर पांगुळ नजिक जोगेवाडी येथील गरीब कुटुंबातील तसेच कुटुंबाचे एकमेव कमवते असलेले, ऊसतोड कामगार असलेले कै.मच्छिन्द्र म्हातारदेव खाडे (वय 35 ) यांचा दहा दिवसापूर्वी कुंडल साखर कारखाना या ठिकाणी मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती.

या अकाली घटनेने कुटूंबाचा आर्थिक आधारच गेल्याने त्यांचे कुटुंबासमोर मुलींच्या व मुलाच्या शिक्षणाचा व उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला होता.
परंतु आपल्या मित्राच्या कुटूंबियांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने खाडे यांच्या मित्र परिवारांनी सोमवार रोजी सकाळी दशक्रिया विधीच्या वेळी पिंडीवर तीळ वाहण्याबरोबरच ज्याला जमेल तशी ,शक्य तेवढी आर्थिक  स्वरूपात मदत करावी असे आवाहन उपस्तीत लोकांना केले .
त्यामध्ये सर्वांनी मिळून खारीचा वाटा उचलत फोनपे ,गुगलपे, तसेच रोख स्वरूपात मदत केली.
यामध्ये सर्वांनी  मिळून 1 लाख 37 हजार 771 रुपये इतकी रक्कम जमा झाली. यावेळी हरी महाराज यांचे प्रवचन झाले. असा उपक्रम या भागात प्रथमच हाती घेतल्याने परिसरात खाडे यांच्या मित्रांचे कौतुक केले जात आहे.
या कामी  महेश शिरसाटसर , विमा प्रतिनिधी सोमराज बडे, काकासाहेब बडे, देविदास बडे, आण्णा बडे, रमेश ढाकणे, विठ्ठल सारुक यांनी सहकार्य केले.  कै.मच्छीन्द्र खाडे यांच्या पत्नीकडे कुटुंबियांचे सांत्वन करीत जमा केलेली आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
👉संकलन- पत्रकार सोमराज बडे
मोबा-9421902332

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments