Monday, May 20, 2024
Homeक्राईम'पॉलिसी क्लेम' साठी मनोरुग्णाचा सर्पदंश करून खून ; पाच आरोपींना अटक

‘पॉलिसी क्लेम’ साठी मनोरुग्णाचा सर्पदंश करून खून ; पाच आरोपींना अटक

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर – 
राजूर पोलिस ठाणे हद्दीत पैशाच्या हव्यासापोटी ‘पॉलिसी क्लेम’ साठी मनोरुग्णाचा सर्पदंश करून हत्या केल्याचा प्रकार राजूर पोलीस व इन्शुरन्स कंपनीच्या तपास यंत्रणेमुळे उघड झाला आहे. या प्रकरणी पाचजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भादवि कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने व राजूर पोलीस ठाण्याचे सपोनि नरेंद्र साबळे, इन्शुरन्स कंपनीच्या तपास यंत्रणेचे पंकज गुत्पा हे उपस्थित होते.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रभाकर भिमाजी वाघचौरे, संदिप तळेकर (रा.पैठण, ता.अकोले), हर्षद रघुनाथ लहामगे (रा.राजूर, ता.अकोले), हरिष रामनाथ कुलाळ (रा. कोंदणी, ता. अकोले) प्रशांत रामहरी चौधरी (रा.धामणगाव पाट, ता.अकोले) अशी नावे आहेत.

याबाबत समजलेले माहिती अशी की, राजूर पोलिस ठाण्यात आर.पी.सी.१७४ प्रमाणे दि.२२ एप्रिल २०२१ रोजी गुन्हा  दाखल झाला होता.  त्यानुसार त्यांचा शोध घेतला असता तो बडोदा गुजरात येथे सापडला.  त्यांचेकडे विचारपूस करता त्याने सांगितले.  तो सुमारे 20 वर्षांपासून त्यांच्या परिवारासह अमेरिकेत राहत होतो. तो जानेवारी २०२१  मध्ये भारतात आलेला आहे.  तो त्यांचे सासरावाडी धामणगाव पाट येथे राहत होता. त्याने त्यांचा 15 लाख अमेरिकन डॉलरचा डेथ इन्शुरन्स काढलेला होता.  त्यामध्ये त्याला क्लेमचे पैसे घ्यायचे होते. त्याकरिता राजूर येथे  प्रभाकर भिमाजी वाघचौरे, संदिप तळेकर, हर्षद रघुनाथ लहामगे,  हरिष रामनाथ कुलाळ, प्रशांत रामहरी चौधरी याच्या सोबत बसून कट रचला.  आपल्याला क्लेम पास करण्यासाठी एक व्यक्तीस आणून त्यास संर्पदंश करून जिवे मारून त्यांचा प्रभाकर भिमाजी वाघचौरे नावाने पी.एम करून त्यांचे कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीला देऊन क्लेम पास करण्याचे त्यांनी ठरवले.
त्यानुसार त्यांनी राजुर येथे एका महिन्याकरिता एक रुम भाड्याने घेतली.  हर्षद रघुनाथ लहामगे याने संर्पदंश करिता एक विषारी नाग मिळविला. प्रभाकर वाकचौरे व  प्रशांत चौधरी याने एक वेडसर इसम याचा शोध घेऊन त्यास राजुर येथील रुमवर आणले.  दि. 22 एप्रिल 2021 रोज पहाटे प्रभाकर भिमाजी वाकचौरे, हर्षद लहामगे व हरिष कुलाळ यांनी वेडसर व्यक्तीच्या उजव्या पायाला विषारी सापाचा चावा दिला. त्यानंतर त्यांनी ती व्यक्ती मयत झाल्यानंतर ग्रामिण रुग्णालय राजुर येथे नेले.  त्यानुसार तेथे मयताचे नातेवाईक असल्याचे सांगितले. ओळखपत्र दाखवून पीएम. करून मयताचा अंत्यविधी केला होता.  सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याबाबत सविस्तर सांगितली.  वेडसर व्यक्ती कोण याबाबत पोलिसांनी  तपास केला असता, ती व्यक्ती नवनाथ यशवंतराव आनप (वय ५०, रा. धामणगाव आवारी ता. अकोले, जि. अहमदनगर) असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर
तपासामध्ये खूनाचा प्रकार उघडकीस आल्याने राजुर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं। 183/2021 भा.द.वी कलम 300, 201.34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक  श्रीमती दिपाली काळे मॅडम, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल मरने यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस ठाण्याचे सपोनी नरेद्र साबळे,  पोसई किरण साळुंके (अकोले पोलीस ठाणे ), पोहेकाॅ नेहे, पोना भडकवाड, पोना डगळे, मपोना वाडेकर, पोना पटेकर, पोकाॅ गाढे, पोकाॅ थोरात, पोकाॅ फटांगरे, पोकाॅ काळे, चापोकाॅ मुळाणे, पोकॉ प्रमोद जाधव, पोना फुरकान शेख (सायबर सो श्रीरामपुर) आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments