Monday, May 20, 2024
Homeक्राईमशिर्डीतील एटीसी टॉवर कंपनीच्या २४ बॅट-या चोरी करणारा मुद्देमालासह पकडला ; एलसीबीची...

शिर्डीतील एटीसी टॉवर कंपनीच्या २४ बॅट-या चोरी करणारा मुद्देमालासह पकडला ; एलसीबीची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork
शिर्डी :
येथील पिंपळवाडी रोडनजिक असणा-या एटीसी टॉवर कंपनीच्या २४ बॅट-या चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह पकडण्याची कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. सुखदेव रामदास खिळदकर (वय ३०, रा. नांदुर विठ्ठलाचे, ता. आष्टी, जि. बीड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखालील एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार सफौ दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, सचिन आडबल, पोना रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ भाऊसाहेब काळे व मेघराज काळे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी टिम’ने दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेताना एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा सुखदेव खिळदकर (रा. आष्टी, जि. बीड) याने केला. तो चोरी केलेल्या बॅट-या विक्री करण्यासाठी अहमदनगर येथे येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने ती माहिती पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम’ला देऊन खात्री करुन कारवाई करण्याबाबत कळविल्याने पथकाने लागलीच चांदणी चौक (अहमदनगर) येथे जाऊन माहितीप्रमाणे एक संशयीत मिळून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सुखदेव रामदास खिळदकर (रा. नांदुर विठ्ठलाचे, ता. आष्टी, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा त्याचा साथीदार आजिनाथ पवार (रा. राहुरी) याच्यासह केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात चोरी केलेल्या ३९ हजार रुपये किंमतीच्या एटीसी कंपनीच्या २४ बॅट-या काढून दिल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments