Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाशासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावत आहे :आ.संग्राम जगताप

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावत आहे :आ.संग्राम जगताप

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर ः
आज इमारत बांधकाम कामगार हा असंघटीत घटक मानला जातो, त्यामुळे अनेक शासकीय योजनांपासून तो वंचित होता. परंतु जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी या बांधकाम कामगारांना एकत्रित करुन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. या संघटनेच्या माध्यमातून आज कामगारांना गृहउपयोगी वस्तू मिळाल्या आहेत. पुर्वीही त्यांना स्टुल किट, पेटी, सुरक्षा साहित्य, स्कॉलरशिप, धनादेश अशा अनेक योजनांचा लाभ हा मिळवून दिला आहे. बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचवावे, त्यांनाही सन्मान मिळावा, शासनाच्या योजनांचा लाभ मिळून त्यांची प्रगती साधवी, यासाठी सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. हमाल-मापाडी यांनाही अनेक आंदोलनातून माथाडी कायदा लागू झाला, आणि त्याची सुरुवात नगरमधून झाली ही अभिमानास्पद बाब आहे. बांधकाम कामगारांनीही आपले हक्क मिळविण्यासाठी आपली नोंदणी करुन घ्यावी. संघटना तुमचे हक्क मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे आहे. शासन दरबारी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी मी स्वत: पाठपुरावा करेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


अहमदनगर जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे वितरण आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक कामगारआयुक्त नितिन कवले, हमाल पंचायचे अध्यक्ष अविनाश घुले, कॉ.बाबा आरगडे,सरचिटणीस नंदू डहाणे, खजिनदार पॉल भिंगारदिवे, अजित साळवे, बारस्कर, अशोक बनकर, चित्रा माळगे, शारदा उमाप, आसिफ कादरी, पंडित कांबळे, अशोक येवले आदिंसह कामगार उपस्थित होते.
अविनाश घुले म्हणाले, बांधकाम कामगारांना त्यांचे हक्क मिळवे, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा, यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून आज गृहपयोगी साहित्याचे कामगारांना वाटप केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कामगारांनीही आपली अधिकृत नोंदणी केली पाहिजे. त्यासाठी संघटना आपणास सर्वोतोपरि सहकार्य करेल. आ.संग्रामभैय्या जगताप यांच्या माध्यमातून हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, इमारत बांधकाम, पतसंस्था आदिंबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन मागण्या पुर्ण केल्या आहेत. त्यामुळे या कामगारांना त्यांचे हक्क मिळत आहेत. त्याचबरोबर आ.संग्रामभैय्या जगताप यांनी नगर शहराच्या विविध विकास कामांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी आणल्याने पुढील काळात शहराचा चेहरा-मोहरा बदलेल, असे कर्तुत्ववान नेतृत्व आपणास लाभल्याचे सांगितले.
याप्रसंगी कॉ.बाबा आरगडे यांनी आपल्या हक्कासाठी संघटन हे महत्वाचे आहे. संघटनेच्या माध्यमातूनच आपले हक्क मिळू शकतात. त्यासाठी प्रत्येकाने संघटनेशी संलग्न रहावे, असे आवाहन केले.
प्रारंभी हमाल पंचायतचे अध्यक्ष स्व.शंकरराव घुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. प्रास्तविक सरचिटणीस नंदू डहाणे यांनी केले. सूत्रसंचालन पॉल भिंगारदिवे यांनी केले. शेवटी आभार अजित साळवे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments