Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकविनायक नरवडे,सुरज गुंजाळ यांचा सत्कार

विनायक नरवडे,सुरज गुंजाळ यांचा सत्कार

युपीएससी परिक्षेेत जिल्ह्याचे नाव देशपातळीवर झळकले

– अविनाश घुले

    नगर – नगर जिल्हा हा शेती, सहकार, कारखानदारी याबरोबरच आता प्रशासकीय अधिकार्‍यांचा जिल्हा म्हणूनही प्रसिद्धी पावत आहेत.

गेल्या काही वर्षात प्रत्येक बॅचला जिल्ह्यातील विद्यार्थी युपीएससी परिक्षा पास होत जिल्ह्याचे नाव देशपातळीवर गाजवत आहेत.

आज युपीएससी परिक्षेत निवड झालेले गुंजाळ व नरवडे यांनी आपल्य मेहनतीने हे यश संपादन केले आहे.

नगरच्या मातीशी नाळ जुळलेले हे दोन्ही अधिकारी हे आपल्या कार्यकर्तुत्वाने ज्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी चांगली सेवा देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देतील.

त्यांच्या यशाचा झेंडा असाच उंचावत राहील, अशा शुभेच्छा जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिल्या.

    जिल्हा हमाल पंचायत येथे पारनेरकर मित्र परिवाराच्यावतीने युपीएससी परिक्षेमध्ये यश संपादन केले विनायक नरवडे व सुरज गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, तारकराम झावरे, बंटी गुंजाळ, डॉ.कारभारी नरवडे, चंद्रशेखर गुंंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, अक्षयदीप झावरे, धनंजय नरवडे, एस.पी.थोरात, एस.के.सोनवणे, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, डॉ.मोटे आदि उपस्थित होते.

    याप्रसंगी तारकराम झावरे म्हणाले, सर्वसामान्य कुटूंबातील मुलेही आपल्या जिद्दीने वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत.

युपीएससी सारखी अवघड परिक्षा उत्तीर्ण होऊन या मुलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण असल्याने जनतेच्या सेवेत आपले योगदान देतील, यात शंका नाही. त्याचबरोबर नगरचे नाव देशपातळीवर आणखी उंचावतील, असा विश्वास व्यक्त केला.

    याप्रसंगी विनायक नरवडे व सुरज गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बंटी गुंजाळ यांनी केले तर आभार गोविंद सांगळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments