Monday, May 20, 2024
Homeक्राईममुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची शिक्षा

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची शिक्षा

NagarReporter
Online news Natwork
अहमदनगर :
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल आकाश बबन शिरसाठ (वय २०, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी) याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायद्यानुसार (पोस्को) आणि अत्याचाराबद्दल १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी ठोठावली. विशेष सरकारी वकील ॲड. मनीषा केळगंद्रे- शिंदे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले.
मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात दि.१ जुलै २०१५ रोजी अल्पवयीन मुलीस आरोपी आकाश बबन शिरसाठ याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली होती. पोलिस उपनिरीक्षक सी.आर. गावंडे यांनी गुन्ह्याचा तपास करून पीडित मुलीस ३१ जुलै २०१५ रोजी इंदापूर (पुणे) येथून आरोपीच्या ताब्यातून सोडवले. मुलीच्या जबाबावरून राहुरी पोलिसांनी अत्याचाराचा व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पीडित मुलीची साक्ष, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तसेच वयासंदर्भात नगर परिषद राहुरी यांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी आकाश शिरसाठ याला शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोह के. एन. डहारे, संजय पठारे, रमेश शिंदे यांनी सहकार्य केले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments