Monday, May 20, 2024
Homeक्राईममिठाईवाल्यावरील हल्ल्यातील आरोपी अखेर जेरबंद

मिठाईवाल्यावरील हल्ल्यातील आरोपी अखेर जेरबंद

पण नगरातील 7 लुटीच्या घटनांचाही तपास लावण्यात ‘नगर एलसीबी टिम’ ला यश

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर ः
शहरातील बन्सी महाराज मिठाईवाले यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या आरोपींना अखेर पोलिसांनी पकडले. यामुळे अहमदनगरातील मागील वर्षभरामध्ये 7 व्यापार्‍यांना लुटण्याच्या घटनांचीही माहिती मिळण्यात अहमदनगर एलसीबी टिमला यश आले आहे. सुनिल भानुदास जाधव (वय 23, रा. घोणसे क्लासजवळ, प्रेमदान हाडको, सावेडी, अहमदनगर), महेंद्र लक्ष्मण धायगुडे (वय 20, रा. भरतगांव, ता. दौंड, जि. पुणे), अजय अशोक चव्हाण (वय 32, रा. सिध्दार्थनगर, अहमदनगर), रजनीकांत संजय गरुड (वय 28, रा. नागापुर एमआयडीसी, अहमदनगर) याच्यासह चोरीचा माल विकत घेणारा रमनpánská bunda kappa vasil geaca jordan barbati white stretch jeans white stretch jeans bradley dolma kalem اسعار كاميرات dslr adidas buty yung 1 nike presto boys grade school اسعار كاميرات dslr nfl jersey store toppaliivi pitkä naiset barbecue vendita amazon motorrad sturmhaube seide black nike cap ebay manteau coat homme सुदर्शन मुड्डुपल्ली (वय 52, रा. भापकर किराणा दुकानमागे, प्रेमदान हाडको, अहमदनगर), पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून आरोपींचा साथीदार रोहित मनिष पवार यास ताब्यात घेण्यात आले आहे.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार संदीप पवार, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, फुरकान शेख, विशाल दळवी, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, प्रमोद जाधव, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, रणजित जाधव, संतोष खैरे, रोहित मिसाळ, संभाजी कोतकर, अर्जुन बडे आदिंच्या टिमने ही कामगिरी केली आहे.

आरोपीकडून ओळख पटू नये, यासाठी हुडी जर्कीनचा वापर
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे पोलिसांनी विचारपुस करता आरोपी हे शहरातील व्यापार्‍यांना हेरुन त्यांचा दिवसभराचा व्यवहार झालेेनंतर घरी जातांना ज्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. नसतील अशी ठिकाण निश्चीत करत होते. प्रत्येक आरोपीवर लोकेशन देण्यापासून ते घटना पूर्ण होईपयर्र्ंत वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली होती. आरोपी हे ओळख पटू नये, यासाठी हुडी असलेले जर्कीनचा वापर करत होते.
याबाबत समजलेली मािहिती अशी की, दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी अहमदनगर शहरातील मिठाईवाले धिरज मदनलाल जोशी (रा. किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहोर रोड, अहमदनगर) हे त्यांच्या रामचंद्र खुंट येथील बन्सी महाराज मिठाई नावाचे दुकान बंद करुन घरी जात असतांना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराजवळ दोनजणांनी दुचाकीवर येऊन त्यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करुन पळून गेले होते. या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं. 146/2024 भादवि कलम 307, 504, 34 सह आर्म अ‍ॅक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनाठिकाणी एसपी राकेश ओला, एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी गुन्हा ठिकाणी भेट दिली होती. भेट दिल्यानंतर घटना ही जबरी चोरीच्या उद्देशाने झाली असल्याची शक्यता होती. यापूर्वीही अहमदनगर शहरामध्ये व्यापारी यांना मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिणे चोरीच्या घटना घडलेल्या असल्याने एसपी ओला यांनी पोनि श्री आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार तपासकामी एलसीबी टिम तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी सूचना दिल्या.
एलसीबी टिमने अहमदनगर शहर व आसपासचे परिसरातील गुन्हा घडल्यापासून जवळपास 250 ते 300 सीसीटीव्ही.कॅमेरे तपासून आरोपींचा येण्याचा व जाण्याचा मार्ग निश्चीत केला होता. त्या आधारे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हा हा आरोपी सुनिल जाधव (रा. प्रेमदान हाडको) याने त्याच्या साथीदारासोबत केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा शोध घेता तो पुणे येथे गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी टिमने पुणे येथे जाऊन 3 दिवस आरोपीची माहिती काढली असता तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. आरोपी हा पुणे येथुन प्रेमदान हाडके, अहमदनगर येथे त्याच्या साथीदारांसोबत पुन्हा गुन्हा करण्यासाठी रात्री 2 वाजण्याच्या वेळी आला असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार एलसीबी टिमने तात्काळ प्रेमदान हाडको परिसरामध्ये सापळा रचला. या दरम्यान तेथे दोन दुचाकीवर चारजण संशयीतरित्या उभे असल्याचे दिसून आले. एलसीबी टिमने त्यांना ताब्यात घेतले. त्यांना यावेळी पोलिसांनी तिसरा डोळा दाखविताच,त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. यावेळी एलसीबी टिमने ताब्यात घेतलेले सुनिल भानुदास जाधव, महेंद्र लक्ष्मण धायगुडे, अजय अशोक चव्हाण, रजनीकांत संजय गरुड यांच्याकडे अधिक सखोल चौकशी करता त्यांनी त्यांचे साथीदार रोहित मनिष पवार, अक्षय धनवे रा. प्रेमदान हाडको, अहमदनगर (फरार) यांचेसह अहमदनगर शहरामध्ये यापूर्वी देखील गुन्हे केल्याचे सांगून चोरीचे गुन्ह्यातील सोन्याचे काही दागिने हे रमन सुदर्शन मुड्डुपल्ली यास विकल्याचे सांगितल्याने त्यास एलसीबी टिमने देखील ताब्यात घेण्यात आले. आरोपींचा साथीदार रोहित मनिष पवार यास शिरुर (जि. पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून 5 तोळे वजनाची सोन्याची चैन, चाकू, बेस बॉल दांडा, 2 दुचाकी, मोबाईल असा एकूण 5 लाख 65 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींना पुढील तपासकामी तोफखाना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments