Monday, May 20, 2024
Homeक्राईमडोेंगराची पायपीट,मुक्काम ठोकून ‘नगर एलसीबी टिमने’ अखेर मंदिर चोरीतील चोरटे पकडली

डोेंगराची पायपीट,मुक्काम ठोकून ‘नगर एलसीबी टिमने’ अखेर मंदिर चोरीतील चोरटे पकडली

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर-
डोेंगराची पायपीट करून दोन दिवस मुक्काम ठोकून अखेर ‘अहमदनगर एलसीबी टिम’ने श्रीगोेंदा तालुक्यातील पारगांव सुद्रीक येथील श्री. सुद्रीकेश्वर महाराज मंदिराच्या गाभार्‍यातील चोरीस गेलेले सर्व चांदीच्या दागिण्यांचा शोध लावून तिघा सराईत आरोपींना पकडण्याची मोहिम फत्त्ते केली आहे. या मोहिमेत भास्कर खेमा पथवे (वय 46, रा.नांदुरी दुमाला, ता. संगमनेर), राजु उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे (वय 30, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर), भाऊराव मुरलीधर उघडे (वय 36, रा.विटा, ता.अकोले) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व कर्जत डिवायएसपी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार सपोनि हेमंत थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, अमृत आढाव, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, रणजित जाधव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खैरे, देवेंद्र शेलार, उमाकांत गावडे व अर्जुन बडे आदिंच्या टिमने ही कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रीच्या वेळी श्रीdischi in vinile compro amazon white stretch jeans pull femme rose fushia bradley dolma kalem hobo bags amazon set tassen amazon dornbracht armatur bad activite ete enfant amazon ventaglio grande amazon اسعار كاميرات dslr best male sex toys pulseiras champions avulsas activite ete enfant amazon robe chiffon fluide custom cycling jersey. सुद्रीकेश्वर महाराज मंदीर (पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभार्‍याचे कुलूप तोडून मूर्तीच्या पाठीमागील व समोरील बाजुस बसविलेली चांदीचे अर्धगोलाकार आकाराची प्रभावळ, मूर्तीचे चौथर्‍याच्या समोरील चांदीचे आभूषण असे चांदीचे 24 लाख रुपयांची दागिने चोरुन नेलेले होते, याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुरनं. 140/2024 भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात होता. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तसेच ग्रामस्थांच्या धार्मिक भावना लक्षात घेत, एसपी राकेश ओला यांनी श्री.सुद्रीकेश्वर महाराज मंदिर चोरीप्रकरणी तातडीने तपास लावून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश अहमदनगर एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार पोनि श्री.आहेर यांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपध्दतीची माहिती घेऊन ‘नगर एलसीबी टिम’ तयार करुन आरोपीची माहिती काढण्याच्या आवश्यक सूचना दिल्या.
एलसीबी टिमने मंदिरामधील सीसीटीव्ही. फुटेज तसेच यापूर्वी मंदिर चोरीच्या गुन्हे करणारे आरोपींचा अभिलेख तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती काढत असतांना गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी भास्कर खेमा पथवे (रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर) याने व त्याचे साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार नगर एलसीबी टिमने नांदुरी दुमाला या ठिकाणी जाऊन आरोपीची माहिती काढली. आरोपी हा नांदुरी दुमाला गावचे शिवारातील डोंगरावर राहतो. त्याच्या घराकडे जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने व लांबूनच घराकडे कोणी आल्याचा त्यास संशय आल्यास तो डोंगरामध्ये पळून जात असल्याची माहिती प्राप्त झाली. यामुळे एलसीबी टिमने आरोपीच्या राहत्या घराच्या आजुबाजुस पायी जाऊन डोंगरात 2 दिवस मुक्काम केला. आरोपी घरी आल्याची माहिती प्राप्त होताच, त्याच्या घरास चोहोबाजुने घेरुन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिस खाक्या दाखवून मंदिर चोरी गुन्ह्याची सखोल, बारकाईने चौकशी केली. यात त्याने साथीदार राजु उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे (रा.नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) व भाऊराव मुरलीधर उघडे (रा.विटा, ता.अकोले) यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरी केलेले चांदीचे दागिने हे भाऊराव उघडे याच्या राहत्या घरामध्ये पुरुन ठेवले असल्याचे सांगून ती चोरीची दागिने काढून दिली.
नगर एलसीबी टिमने ताब्यात घेण्यात आलेले आरोपी भास्कर खेमा पथवे, राजु उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे व भाऊराव मुरलीधर उघडे याच्याकडून श्री. सुद्रीकेश्वर महाराज मंदीर (पारगांव बु, ता.श्रीगोंदा) येथे चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी, चोरी केलेले सर्व चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments