Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकभाविकांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे त्वरित हटवा.-प्रांत अधिकारी प्रसाद मते; मोहटादेवी नवरात्र उत्सव...

भाविकांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे त्वरित हटवा.-प्रांत अधिकारी प्रसाद मते; मोहटादेवी नवरात्र उत्सव आढावा बैठक संपन्न…!

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे ,पाथर्डी : मोहटादेवी (ता.पाथर्डी) देवस्थान मधील शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे तालुक्याचा उत्सव ठरुन सर्व शासकीय यंत्रणांनी आपली जबाबदारी सेवाभावी वृत्तीने व प्रामाणिकपणे पार पाडावी.

पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग विभागांनी यात्रेकरूंना अडथळा ठरणारी अतिक्रमणे त्वरित हटवावीत. यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त मिळेल.,अशी माहिती प्रांत अधिकारी प्रसाद मते यांनी दिली. मोहटा देवस्थान समितीच्या सभागृहात नवरात्र उत्सव नियोजन तयारी आढाव बैठक (ता.४)रोजी संपन्न झाली.

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले, गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे सुभाष केदार, पालिका प्रतिनिधी अंबादास साठे, आगारप्रमुख आरिफ पटेल, मंडलाधिकारी कविता मंडूलकर याशिवाय विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश अश्विनी बिराजदार होत्या. बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांनी कार्यस्थळावर जाऊन कामांची पाहणी केली.

यावेळी बोलताना प्रांत अधिकारी मते म्हणाले की, दर्शनासाठी राज्यातील विविध विभागातून हजारो भाविक पायी चालत येतात. बहुसंख्य भाविकांचा रस्ता पाथर्डी मार्गे असतो. त्यामुळे पालिका व पोलिसांनी पाथर्डीतील विविध अतिक्रमणे अडथळा ठरणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

यात्रा काळात गाभारा दर्शन सुविधा बंद ठेवण्याची भाविकांची मागणी विश्वस्त मंडळांनी मान्य केले आहे. गडाच्या परिसरातील सर्व व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील. अन्न व औषध प्रशासनाकडून खवा, तेल, व सर्व मिठाया ची नमुना तपासणी केली जाणार आहे .याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य परिवहन मंडळाकडून जादा गाड्या सुटून फक्त एसटी बसेस लाच पहिल्या कमानी पर्यंत सोडले जाणार आहे. प्रत्येक दुकानदाराने आग प्रतिबंधक यंत्रणा दुकानांमध्ये बसविणे आवश्यक आहे. आरोग्य, पिण्याचे पाणी ,भोजन व निवास व्यवस्था तत्पर ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी वाहतूक कोंडीसह वाहतुकीचे संपूर्ण नियोजन काटेकोर पूर्ण करावे ,असे मते म्हणाले .

याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले, यंदा यात्रेत एक पोलीस चौकी वाढवून आता तीन चौक्यांवर अहोरात्र कर्मचारी तैनात असतील .चार निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, शंभर पोलीस कर्मचारी ,४० महिला कर्मचारी, एलसीबी चे निरीक्षक व १५ पोलीस कर्मचारी,वाकि-टॉकी दहा सेट, एक वायरलेस सेट ,दोन प्लाटून एस.आर.पी ,शहर वाहतूक नियंत्रणासाठी दोन अधिकारी व वीस पोलीस कर्मचारी,त्याचबरोबर गस्तीपथक असा मोठा बंदोबस्त राहणार असून सुरक्षा व वाहतुकीचे अत्यंत काटेकोर नियोजन होणार असल्याने भाविकांना त्रास होणार नाही.

शहरातही जुने बस स्थानकापासून उपजिल्हा रुग्णालय, आंबेडकर चौक अशा ठिकाणचे रस्त्यावरील सर्व अडथळे दूर करण्याबाबत पालिकेला मदत केली जाईल. मोहरी मार्गे रस्ता तारकेश्वर गड व मोहटे गावातून येणारे रस्त्यावरही फिरते पथक काम करील .होमगार्ड, पोलीस मित्र व स्थानिक स्वयंसेवकाची मदत बंदोबस्तासाठी घेतली जाणार आहे . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी करून आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments