Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रभगवानगड ४६ गावासहीत मिरी-करंजी-तिसगाव व अमरापूर प्रा. पाणीपुरवठा यो. कामात गैरव्यवहार !

भगवानगड ४६ गावासहीत मिरी-करंजी-तिसगाव व अमरापूर प्रा. पाणीपुरवठा यो. कामात गैरव्यवहार !

पाणीपुरवठा मंत्री यांचे ओएसडी बडे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात करोडो रुपयांची डील !
Nagar Reporter
Online news Natwork
पाथर्डी :
पाथर्डी तालुक्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये भगवानगड ४६ गाव मिरी करंजी तिसगाव आणि अमरापूर या तीन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे परंतु या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार होत असून कामांमध्ये अननियमितता आहे, याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्राचे प्रसार माध्यम संयोजक दादासाहेब खेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीवन प्राधिकरण मुख्य सचिव अप्पर सचिव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग मुंबई यांच्याकडील चौकशी समिती येऊन भगवानगड आणि ४६ गाव पाणीपुरवठा योजनचे काम पाहणी करून गेली आहे. यावर रितसर संबंधित व्हीयुबी कंट्रक्शन या ठिकाणी एजन्सीवर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु वरिष्ठांना चौकशी अहवाल सोपवला जाईल, असे सोयीस्कर उत्तर देऊन कारवाई करण्याचे चौकशी समितीने टाळण्याचे दिसत आहे. यावर संबंधित व्हीयुबी कंट्रक्शन या ठेका एजन्सीचे काम तीनही पाणीपुरवठा योजनेची चालू असलेले काम थांबवून त्यांची देयके देण्यात येऊ नयेत अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग मुंबई या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दादासाहेब खेडकर यांनी दिला आहे.


👉 भगवानगड ४६ गाव मिरी करंजी तिसगाव आणि अमरापूर या तीन पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. या कामाची कॉलिटी कंट्रोलकडून तपासणी करण्याची मागणी केली आहे. कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिकरित्या करण्याची मागणी करूनही एमजीपीचे अधिकारी त्याकडे सोयीस्कर डोळे झाक करत आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम मुख्य ठेका एजन्सी न करता सब ठेका एजन्सीकडून काम करण्यात येत असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत.
👉महाराष्ट्राचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे ओएसडी बडे यांच्यामार्फत भगवानगड ४६ गाव मिरी-करंजी-तिसगाव आणि अमरापूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या व्हीयुबी कंट्रक्शन या ठेका एजन्सीला कशा पद्धतीने देण्यात आल्या. याची चौकशी करण्यात यावी. निविदा प्रक्रिया पूर्णतः चुकीच्या केलेल्या असून यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. या पाणीपुरवठा योजनेचे निरीक्षण करण्याचे काम एमजेपी करत असून यामध्ये एमजीपीचे शाम वारे मृणाल धगधगे यांचे व्हीयुबी कंट्रक्शन या ठेका एजन्सीच्या ठेकेदाराबरोबर हितसंबंध असल्याने ते कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत यामुळे शाम वारे मृणाल धगधगे यांची‌ चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावे –
(प्रा दादासाहेब खेडकर – भाजपा – संयोजक प्रसारमाध्यम प्रमुख उत्तर महाराष्ट्र) .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments