Sunday, May 19, 2024
Homeक्राईमपाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथे दोन ठिकाणी चोरी.

पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथे दोन ठिकाणी चोरी.

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे

पाथर्डी/ प्रतिनिधी: तालुक्यातील कारेगाव येथे दोन ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शेताला पाणीnike air max 270 women’s sale violet shampoo before and after ray ban 3025 58mm polarized replacement lenses bradley dolma kalem wolford panty neon 40 pulseiras champions avulsas nike huarache womens white violet shampoo before and after motorrad sturmhaube seide nike rouge jaune vert pull femme rose fushia jordan 4 cheap pulseiras champions avulsas gipsy lederjacke beige damen toppaliivi pitkä naiset देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या घरातए ठेवलेली रोख रक्कम पाच लाख रुपये व तीन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सदरची चोरीची घटना आजिनाथ शंकर भाबड यांच्या घरी घडली आहे. तर दुसरी चोरीची घटना शिवाजी मारुती दहिफळे यांच्या घरी घडली असून त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून घरात शिवाजी दहिफळे यांची पत्नी बबीता शिवाजी दहिफळे या झोपेत असताना त्यांचे गळ्यातील अडीच ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र काढून घेतले. या दोन्ही चोरींच्या घटनांमुळे कारेगाव सह परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

गुरुवार ता.१५ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता शेतात आजिनाथ भाबड आणि त्यांचे वडील शंकर गणपत भाबड हे घराला कुलूप लावून शेताला पाणी द्यायला गेले होते. आजिनाथ यांची आई या घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये झोपल्या होत्या. पाणी भरून झाल्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास भाबड पिता-पुत्र घरी परत आले असता घराचे दोन्ही दरवाजे उघडे दिसले घरातून अंधाराचा फायदा घेत तीन ते चार जण पळत जात असताना दिसले त्यानंतर आरडा ओरड केला. त्यावेळी शेजारील लोक जागे झाले, पळून गेलेल्या अज्ञात चोरट्यांचा लोकांनी पाठलाग केला. परंतु ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले . भाबड यांच्या घरातील कपाट व पेटीचे कुलूप तोडून त्यातील पाच लाख रुपये रोख रक्कम व पेटीतील सोन्याचे दागिने अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घेऊन गेले आहेत.

तर दुसऱ्या एका घटनेत शिवाजी दहिफळे यांचे घरातील कडी-कोयंडा तोडून घरात शिवाजी यांची पत्नी झोपेत असताना त्यांच्या गळ्यातील अडीच ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र चोरटे काढून घेऊन गेले आहेत. तसेच सुमारे एक महिन्यापूर्वी मोहटादेवी रस्त्यावर कार्यसिद्धी माता देवीचे मंदिर आहे. देवीचा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाच्या दोन दिवसांनी दानपेटी मधील रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या वाढत्या चोऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या चोरांचा तपास लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments