Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हानिखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा महाविकास आघाडीचा निषेध

निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा महाविकास आघाडीचा निषेध

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
पाथर्डी ः
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.


यावेळी बोलताना प्रतापराव ढाकणे म्हणाले, जेष्ठ पत्रकार विचारवंत संपादक निखील वागळे यांच्या वाहनावर तथाकथीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे येथे हल्ला करूण त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत आहे. .निखील वागळे महाराष्ट्रात गेली अनेक वर्षापासून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया क्षेत्रात निष्पक्षः निर्भिडपणे जनतेची बाजू शासन दरबारी मांडतात. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांना सत्य परिस्थितीत झोंबत असल्याने आता त्यांच्या समर्थकांनी पत्रकारांवरही हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. ही बाब निकोप लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरणारी आहे. राज्यात मागील दोन वर्षात महायुतीचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून झुंडशाही व गुंडगिरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र अशा निंदणीय घटनांचा तपास सत्तेतील नेत्यांमुळे दाबला जातो. काल पुणे येथे झालेल्या श्री.निखील वागळे यांच्या गाडीवरील हल्ला एकाप्रकारे त्यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न असू शकतो अशा भ्याड हल्याचा आम्ही शेवगांव-पाथर्डी तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध नोंदवित आहोत. या वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, मा.नगरसेवक बंडू पा.बोरूडे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, भगवानराव दराडे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विष्णुपंत ढाकणे,सिताराम बोरूडे, देवा पवार, अतिष निर्‍हाळी, डॉ.दिपक देशमुख, गणेश वायकर, बन्सी आठरे, हुमायुन आतार, भाऊसाहेब धस, गहिनीनाथ शिरसाट आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments