Monday, May 20, 2024
HomeUncategorizedनवरात्रोत्सवानिमित्त बंगाली बांधवांचा दुर्गात्सवास प्रारंभ

नवरात्रोत्सवानिमित्त बंगाली बांधवांचा दुर्गात्सवास प्रारंभ

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर –
नवरात्रोत्सवानिमित्त नगरमध्ये विविध व्यवसायाच्यानिमित्त आलेले बंगाली बांधव, लष्करातील विविध आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी, औद्योगिक वसाहतीतील उद्योजक यांच्यावतीने दरवर्षी भुईकोट किल्ल्याजवळील एम.ई.एस.च्या क्लब मैदानावर दुर्गा पूजा मोठ्या मनोभावे बंगाली बांधव करतात. हा उत्सव साजरा करण्याचे बंगाली बांधवांचे 46 वे वर्ष आहे. यंदाची श्री दुर्गा मातेची मुर्ती ही 6.5 फुटी असून, अतिशय सुबक, सुंदर व अभुषणे असलेली ही मूर्ती कलकत्ता येथील कलाकार एस.के.पाल यांनी तयार केली आहे. या एकसंघ मुर्तीमध्ये श्री गणेश, श्री कार्तिकेय, श्री लक्ष्मीमाता व श्री सरस्वती माता यांच्या देखील मुर्ती आहेत.


या विषयी सविस्तर माहिती देतांना नगरमधील प्रतिथयश उद्योजक व बेंगॉई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीकुमार ब्रह्मा व त्यांच्या सुपत्नी सौ.रंजना ब्रह्मा यांनी माहिती दिली. नवरात्र सुरु झाल्यानंतर सहाव्या दिवशी षष्ठीला बंगाली बांधव या दुर्गामातेची प्रतिष्ठा करतात व पुजा आर्चेस सुरुवात करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे या दुर्गापुजेत खंड पडला होता, मात्र यावर्षी बंगाली बांधव मोठ्या उत्साहाने दुर्गा पुजा उत्सवामध्ये समाविष्ठ झाले आहे. नगरमध्ये सुमारे 100 बंगाली बांधव असून, पाच दिवस चालत असलेल्या या दर्गामातेच्या महोत्सवामध्ये रोज विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सायंकाळी बंगाली बंधू-भगिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील सादरीकरण करतात.
षष्ठीपुजेनंतर दुसर्‍या दिवशी सप्तमी पुजा, तिसर्‍या दिवशी मोह अष्टमी, चौथ्या दिवशी मोह नवमी व पाचव्या दिवशी दशमी पूजा केली जाते. दररोज संधी पुजा, संध्या आरती केली जाते. यंदा 5 ऑक्टोबर रोजी दुपारी दशमी पूजा केली जाणार असून, त्यानंतर सिंदूर उत्सव, विसर्जन जत्रा, दुपारी दुर्गा मातेच्या मुर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहाने बंगाली बांधव करतात. अष्टमीला दि.3 ऑक्टोबर रोजी 108 दिवे लावून बंगाली बांधव मोठा उत्साहाने हा दिवस करतात.
यासाठी एक विशेष कमिटी दरवर्षी तयार केली जाते. यंदा या कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून अनुपदास हे काम पाहत असून, सेक्रेटरी म्हणून प्रदीर हजरा, एस.के.भुनया, एस.चक्रवर्ती हे काम पाहत आहेत.

संकलन : अनिल शहा (प्रेस फोटोग्राफर)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments