Monday, May 20, 2024
HomeUncategorizedनगर जिल्ह्यात अवैध दारुविरुध्द विशेष मोहिमेत १२८ ठिकाणी 'एलसीबी'ची कारवाई

नगर जिल्ह्यात अवैध दारुविरुध्द विशेष मोहिमेत १२८ ठिकाणी ‘एलसीबी’ची कारवाई

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर-
जिल्ह्यात दि.२९ ते दि. ३० जून २०२२ या कालावधीत अवैध दारुविरुध्द विशेष मोहिम राबवून १२८ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२८ आरोपींविरुध्द कारवाई करून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ लाख ८८ हजार ४३० रु. कि. चा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments