Monday, May 20, 2024
HomeUncategorizedनगर एलसीबी ः पाथर्डी तालुक्यात जुगार अड्डयावर छापा ; बीड जिल्ह्यातील 12...

नगर एलसीबी ः पाथर्डी तालुक्यात जुगार अड्डयावर छापा ; बीड जिल्ह्यातील 12 जणांना पकडले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी :
तालुक्यातील भालगांव येथील जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात बीड जिल्ह्यातील 12 जुगार खेळणा-यांना पकडण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशानुसार अहमदनगर एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे पोहेकॉ अतुल लोटके, पोना संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, जालिंदर माने, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, बाळू खेडकर आदिंच्या टिमने ही कारवाई केली.


मि
ळालेल्या माहिती अशी की, भालगांव शिवारातील उकांडाफाटा (ता. पाथर्डी) येथील हॉटेल राजगडचे पाठीमागे जाऊन खात्री करता काहीजण गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेऊन पैशावर हारजीतीचा तिरट जुगार खेळताना दिसले. एलसीबी टिम व पंचाची खात्री होताच अचानक छापा टाकला. तेथे बसलेल्यांना एलसीबी टिम व पंचाची ओळख सांगितली. त्यांचे नाव गांव विचारले असता बसलेल्यांनी त्यांची नावे आजीनाथ कुंडलिक खेडकर (वय 47, रा. घाटशिळगांव, ता. शिरूर कासार, जि. बीड), ज्ञानेश्वर हरीभाऊ ढाकणे (वय 39, रा. बाबी, शिरुर कासार, जि. बीड), दत्ता आण्णासाहेब तांबे (वय 40, रा. राक्षस भुवन, ता. शिरुर कासार, जि. बीड), भगवान विष्णु आंधळे (वय 33, रा. बावी, ता. शिरुर, जि. बीड), विष्णू एकनाथ पवार (वय 50, रा. झापेवाडी, ता. शिरुर कासार, जि. बीड), शिवाजी लक्ष्मण म्हस्के (वय 56, रा. आनंदगांव, ता. शिरुर कासार, जि. बीड), भगवान दगडू ढाकणे (वय 38 रा. बावी, ता. शिरुर कासार, जि. बीड), अन्वर इस्माईल शेख (वय 42, शिरुर कासार, जि. बीड), पोपट रामनाथ विघ्ने (वय 47, रा. आनंदगांव, ता. शिरुर कासार, जि. बीड), बाळु रघुनाथ गायकवाड (वय 40, रा. शिरुर कासार, जि. बीड), गिन्यानदेव तुकाराम भोसले (वय 45, रा. झापवाडी ता. शिरुर कासार,जि. बीड) व बाळासाहेब कोंडीराम घोरपडे (वय 48 ता. शिरुर कासार, जि. बीड) असे असल्याचे सांगितले.


या सगळ्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली, यात 93 हजार 430 रुपये रोख रक्कम व 2 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी, 99 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे 9 मोबाईल फोन व तिरट जुगारीची साधने असा एकूण 4 लाख 62 हजार 430 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
या 12 आरोपीविरुध्द एलसीबीचे पोकॉ शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ॥ 756 / 2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही पाथर्डी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments