Monday, May 20, 2024
HomeUncategorizedनगरात वंदे मातरम्, भारतमाता की जय,  'कोतवाली'ची 'तिरंगा' दुचाकी रॅली

नगरात वंदे मातरम्, भारतमाता की जय,  ‘कोतवाली’ची ‘तिरंगा’ दुचाकी रॅली

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर
शहरातून वंदे मातरम्, जय हिंद, भारतमाता की जय, ही घोषवाक्य व हातात देशाची आणबाण शान असलेला तिरंगा ध्वज हातात घेऊन अहमदनगर शहरातून कोतवाली पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.१२) दुचाकी रॅली काढण्यात आली.


नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पो नि संपत शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचा-यांनी कोतवाली पोलिस ठाण्यापासून डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा-छञपती शिवाजी महाराज पुतळा-सक्करचौक- जुनी महापालिका माळीवाडा- चितळीरोड ते कापडबाजारमार्गे पुन्हा कोतवाली पोलिस ठाणे अशी दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅली मोठ्या उत्साहाने पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments