Monday, May 20, 2024
HomeUncategorizedनगरसेविका सौ.सुवर्णा जाधव यांनी स्व:खर्चाने बसविलेल्या मोटार बोअरवेलचे लोकार्पण

नगरसेविका सौ.सुवर्णा जाधव यांनी स्व:खर्चाने बसविलेल्या मोटार बोअरवेलचे लोकार्पण

भविष्यात पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटविणार – सुवर्णा जाधव

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- 
पाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, विशेषत: सर्वात जास्त पाण्यासाठी महिलांची तकतक असते. गेल्या काही दिवसांपासून फेज-2 चे काम, अमृत योजनेचे काम आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे स्टेशनरोड भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. याबाबत आपण वेळोवेळी मनपाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करुन यासाठी पाठपुरावा केला आहे. परंतु सुरु असलेल्या विकास कामांमुळे सध्या नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहे. ही बाब लक्षात घेता, आपण स्व:खर्चाने या भागात बोरवेल दिला आहे, त्यातून परिसरातील नागरिकांची पाण्याची सोय होईल. सरोष टॉकिजपासून पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या लाईन टाकण्याचे काम सुरु असून, भविष्यात संपुर्ण स्टेशनरोड परिसरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे या भागातही पाण्याच्या नवीन लाईन टाकून पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवू, अशी ग्वाही नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी दिली.

   प्रभाग क्र.15 च्या नगरसेविका सौ.सुवर्णा जाधव यांनी स्व:खर्चाने सागर कॉम्प्लेक्समधील रहिवासीना वापरण्याच्या पाण्यासाठी नवीन मोटार बोअरवेलचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, बबलू शिंदे, रेखा विधाते, संपूर्णा सावंत, भारती पगारे, मंदाकिनी काळे, विठाबाई साळूंके, अरुणा आहेर, शितल बोरा, मनिषा जोशी, सुजाता गायकवाड, आकाश फंड, सर्वेश आहेर, विशाल गायकवाड, दळवी, गोरे आदि उपस्थित होते.
     याप्रसंगी अनिल शिंदे, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड यांनी मनोगतातून प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सर्व एकत्रित काम करत असून, नागरिकांच्या समस्या सोडविणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. या भागातील पाण्याचा महत्वाचा प्रश्न आज तत्पुरता सुटला असला तरी भविष्यात पाण्याची कोणतीही समस्या राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे सांगितले.
     परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून असलेला पाणी प्रश्न वैयक्तिकरित्या सोडविल्याबद्दल नगरसेविका सौ.सुवर्णा जाधव यांचे आभार मानले.

  

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments