Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाधनगर समाजाच्या कार्यकर्त्यांला मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा : धनगर समाजाची...

धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांला मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा : धनगर समाजाची मागणी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर:
धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांला मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख
काका शेळके, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, वधू वर मेळावा अध्यक्ष राजेन्द्र तागड, धनगर समाज सेवा संघ अध्यक्ष निशांत दातीर, राष्ट्रीय जनमंच प्रदेश महासचिव भगवान जऱ्हाड, ज्येष्ठ नेते अशोक होंनमने, केदार हजारे, संग्राम शेळके, अथव गंगावणे, वैभव घायतडक, अशव औटी, कृषा तेपले, राहुल देठे आदिंसह धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले की,सोलापूर जिल्ह्यात धनगर आरक्षण कृती समितीचे शंकर बंगाळे या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन दिले. तद्नंतर भंडारा उधळला. मात्र या प्रकारानंतर विखे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. पोलिसांसमक्ष झालेल्या या मारहाणीचा आम्ही निषेध करत असून, संबंधितांवर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे.

याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात येईल, याबाबतची प्रशासनाने नोंद घ्यावी.
तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी-मेष महामंडळची प्रस्तावित जागा ढवळपुरी, ता.पारनेर येथून बदलून अन्यत्र नेण्याच्या हालचली प्रशासकीय पातळीवर सुरु आहेत. याबाबत समाजात तीव्र असंतोष असून, समाजाचे नेते आ.प्रा.राम शिंदे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांनी विधान सभेच्या अधिवेशनात मंजूर केलेला विषय कोणाच्या सांगण्यावरुन बदलला जात आहे, याही खुलासा होण्याची गरज आहे.
अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नामांतराच्यावेळी विरोध करणार्‍यांच्या विरोधात धनगर समाज आक्रमक असल्याने अशा घटना घडत आहेत, तरी धनगरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात याव्यात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments