Monday, May 20, 2024
HomeUncategorizedदुचाकीस्वारास अडवून लूटमार करणारा  अटक ; ग्रामसेविकेस धक्काबुक्की करणा-यास अटक :...

दुचाकीस्वारास अडवून लूटमार करणारा  अटक ; ग्रामसेविकेस धक्काबुक्की करणा-यास अटक : नगर तालुका पोलिसांची कारवाई

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर –
नगर-पाथर्डी रोड चाँदबिबी महालाजवळ दुचाकीस्वारास अडवून लूटमार करणा-या चोरट्यास सामनगाव (ता शेवगाव) येथून पकडून आणण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. सचिन काते असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोउपनि रणजित मारग, पोकॉ विशाल टकले, पोकॉ संदीप जाधव,पोकॉ संभाजी बोराडे, पोहेकॉ धर्मराज पालवे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की,  दि . १७ जून रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास नगर पाथर्डी रोडने दुचाकीवर गावाकडे जात असताना चाॅदबीबी महालाजवळ पाठीमागून दोनजण दुचाकीवर   आले व म्हणाले की तुमच्या गाडीचे हाप्ते थकले आहेत. दुचाकी थांबवा असे म्हणाले असता त्याची दुचाकी थांबविली. पाठीमागून लगेच ओळखीचे आरोपी सोनू कसबे (रा . कोरडगाव ता . पाथर्डी जि . अहमदनगर ), सचिन काते (रा . सामानगाव ता . शेवगाव जि अ.नगर) हे आले व फिर्यादीस म्हणाले की तू जास्त माजला काय असे म्हणून आरोपी सचिन काते यांने त्याचे हातातील लाकडी काठीने डोक्यात मारुन आरोपी सोनू कसबे याने त्याचे हातातील लोखंडी पाईपने  हातावर , चहऱ्यावर मारले तेव्हा साक्षीदार अकाश कंक्कर दिनकर हा भांडणे सोडवण्यासाठी आला असता,  त्याला पण दोन्ही आरोपींनी मारहाण केली होती. मामा गणेश दिनकर यांना पण लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिविगाळ केली होती व आरोपी सोनू कसबे याने मोबाईल घेऊन  फोडून टाकला.  १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम काढून घेतले आहेत, या सागर मधुकर डाके ( रा . कोरडगाव रोड , रामगिरबाबा टेकडी पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात   गुर नं व कलम १३७९/२०२२ भादवी कलम ३२४, ३२७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, ४२७  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हा दाखल होताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी तपास सुरू केला असता आरोपी हा शेवगाव तालुक्यातील होता, तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. पोलिसांनी त्याला दोन वेळेस अटक करण्याचे प्रयत्न सुद्धा केले होते. परंतु पोलिस जाण्याच्या अगोदर तो फरार होत असे. शुक्रवार (दि.२४) रोजी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली की आरोपी सचिन काते हा शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथे आलेला आहे. आता गेल्यास लगेच मिळून येईल अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप,पोउपनि रणजीत मारम यांच्या पथकाने आरोपी सचिन काते याला सामनगाव ,(ता शेवगाव,अहमदनगर) येथून अटक केली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयातही तोडफोड; ग्रामसेविकेस शिवीगाळ, धक्काबुक्की करत रजिस्टर पळविले
नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर –
ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन एकाने महिला ग्रामसेविका, सरपंच यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत कार्यालयातील खुर्च्याची तोडफोड करून रजिस्टर पळवून नेल्याची घटना नगर तालुक्यातील आंबिलवाडी येथे शुक्रवारी (दि. २४) दुपारी घडली. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत ग्रामसेविका स्वामिनी ज्ञानदेव ढाकणे (रा. ढवणवस्ती, सावेडी, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी ढाकणे या नगर तालुक्यातील आंबिलवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत आहेत. शुक्रवारी (दि.२४) या कार्यालयात काम करत असताना आरोपी आकाश लीप भोईटे (रा. आंबिलवाडी ता.नगर) हा कार्यालयात ला व त्याने ग्रामसेविकेला मला रहिवाशी दाखला द्या से म्हणाला असता त्या म्हणाल्या की, रहिवाशी दाखला गण्याचे काम बंद झालेले आहे, असे म्हणाले असता आरोपी यांना म्हणाला की मला तुमच्याकडुन दाखला नाही पाहीजे नरपंच यांचेकडुन रहिवाशी दाखला पाहीजे असे म्हणून त्यांच्या जवळच बसलेल्या महिला सरपंच यांचेकडे गेला व त्यांना रहिवाशी दाखला मागू लागला, त्यावेळी सरपंच यांनी त्यांना सांगितले की, ग्रामपंचायत मधून रहिवाशी दाखले मिळत नाहीत, असे म्हणाल्याचा आरोपीस राग येऊन फिर्यादी हे ग्रामसेवक आहेत, हे माहित असतांना सुध्दा फिर्यादी व साक्षीदार यांना धक्काबुक्की, शिवीगाळ, करून जिवे मारण्याची धमकी दिली. कार्यालयातील खुर्च्याची मोडतोड करून नुकसान करून ग्रामपंचायत कार्यालयातील महत्वाचे असलेले रजिस्टर नं.९ बळजबरीने घेवून गेला आहे. तसेच रजिस्टर नं.८ व तलाठी यांनी दिलेल्या रोडच्या नोटीसा फाडून फेकून दिल्या. या प्रकारानंतर ग्रामसेविका ढाकणे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आकाश भोईटे याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३. १८६, ३२७, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच स.पो.नि. राजेंद्र सानप यांनी तातडीने पथक पाठवून आरोपी भोईटे यास अटक केली. त्याने पळवून नेलेले रजिस्टर ताब्यात घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments