Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशदीर्घायुष्याची खरी गुरुकिल्ली ; निरोगी आयुष्यासाठी आहार, व्यायामासोबत व्यक्तिमत्त्वही हवे खंबीर ...

दीर्घायुष्याची खरी गुरुकिल्ली ; निरोगी आयुष्यासाठी आहार, व्यायामासोबत व्यक्तिमत्त्वही हवे खंबीर : संशोधक

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

वय वाढीची प्रक्रिया धीमी करण्याच्या उपायांवर चर्चा होते तेव्हा व्यायाम आणि आहारावरच लक्ष केंद्रित केलेले असते. पण त्यात व्यक्तिमत्त्वाची भूमिकाही महत्त्वाची असू शकते हे कमी लोकांना माहीत आहे. ८० वर्षांनंतरही चांगल्या आरोग्याचा फायदा कोण घेणार हे व्यक्तिमत्त्वातील अनेक गुण ठरवतात असे अलीकडच्या संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, बुद्धिमत्ता आणि संपत्तीप्रमाणेच व्यक्तिमत्त्व आणि दीर्घायुष्य यात संबंध आहे. ज्या वैशिष्ट्यांकडे लक्ष देऊन आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो अशी काही वैशिष्ट्ये…

1. कर्तव्यनिष्ठता मजबूत राहण्यास मदत करते
कर्तव्यनिष्ठ लोक दीर्घकाळ जगतात. वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठातील सायकॉलॉजीचे प्रा. निकोलस टुरियानो म्हणाले, ‘कर्तव्यनिष्ठता असा गुण आहे, जो प्रकृतीची जोखीम दूर करण्यास मदत करू शकतो. कर्तव्यनिष्ठ लोक व्यायाम व पोषण याबाबत कठोर असतात. तणावपूर्ण स्थितीचा सामना चांगल्या प्रकारे करू शकतात, त्यामुळे प्रकृती चांगली राहते. मनोबल मजबूत असल्याने विपरीत परिस्थितीतही कमजोर राहत नाहीत.’

2. स्वत:कडे लक्ष देण्यासाठी ध्येय प्रेरित करते
स्पष्ट ध्येयासह जीवनात एक दिशा असल्याने ऊर्जा मिळते. जे लोक आमच्या जीवनात ध्येय आहे असे म्हणतात, ते प्रकृती बिघडल्यास लवकर बरे होतात. त्यांच्या मेंदूत आत्म-जागरूकता आणि निर्णय घेणारा भाग जास्त सक्रिय असतो. वॉशिंग्टन विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ पॅट्रिक हिल म्हणाले की, ‘ध्येय असलेल्या कामात सहभागी झाल्याने मनोभ्रम आणि निराशा कमी करण्यात मदत होते.’

3. सकारात्मक लोकांत जास्त आत्मविश्वास असतो
दीर्घायुष्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची आहे. वाढत्या वयात उद्दिष्ट पूर्ण करण्यास सकारात्मकता मदत करते. त्यामुळे त्यांच्यात जास्त आत्मविश्वास असतो. येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मानसशास्त्रज्ञ बेक्का म्हणाल्या,‘जे लोक वाढते वय सकारात्मकतेसह स्वीकारतात, ते इतर लोकांच्या तुलनेत ७.६ वर्षे जास्त जगतात.’

4.बहिर्मुख असल्यास अडचणींशी लढणे सोपे होते
बहिर्मुख असणे हा गुणही आयुष्यात वाढ करतो. कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्रा. सुसान चार्ल्स म्हणतात, ‘सामाजिक संबंध आणि दीर्घायुष्य यात संबंध आहे. सामाजिकदृष्ट्या सक्रिय असणारे लोक आपल्या अडचणी इतरांशी शेअर करू शकतात, त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली राहते. असे लोक निरोगी जीवनशैली जगतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments