Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाजिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या घडामोडीवर लक्ष ; जिल्ह्यात आमदारांनी घरासाठी पोलिस संरक्षण मागितले...

जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या घडामोडीवर लक्ष ; जिल्ह्यात आमदारांनी घरासाठी पोलिस संरक्षण मागितले नाही : एसपी राकेश ओला

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: राज्यात मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनांचे स्वरूप तीव्र होत आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी एका आमदाराचे घर पेटवल्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय पुढारी अथवा आमदारांनी घरासाठी पोलिस संरक्षणाची पोलिस प्रशासनाकडे मागणी केली आहे का?, या प्रश्नावर नगर रिपोर्टरशी बोलताना अहमदनगर एसपी राकेश ओला यांनी म्हटले की, याबाबत अशी काही मागणी जिल्हा पोलिस प्रशासनाकडे आली नसून, अहमदनगर जिल्ह्यात ३० ते ३५ ठिकाणी साखळी उपोषण, सुरू असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांचे मराठा आरक्षण मुद्देवरील आंदोलनावर लक्ष ठेवून आहोत.


एसपी श्री ओला पुढे म्हणाले, जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांना सर्तक राहण्याचे आदेश दिले असून, तालुका स्तरावर पोलिस प्रशासनातील सर्व विभाग बदलत्या आंदोलनाच्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. तसेच जिल्ह्यातील आंदोलन, साखळी उपोषणाबाबत माहिती घेतली जात आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अहमदनगर हून पुणे, औरंगाबाद व बीडकडे जाणा-या एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना पर्यायी खासगी वाहनाने प्रवास करीत असून, यात खासगी वाहनचालक प्रवाशांची मोठी आर्थिक लुट करीत आहेत, ही बाब एसपी श्री ओला यांच्या निर्दशनास आणू देता. त्यांनी याबाबत शहर वाहतूक शाखेकडून माहिती घेऊन कार्यवाही करतो, असेही नगर रिपोर्टरशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments