Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाजिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात हजारो लिटर पाणी गटारीत ; पाईपलाईन दुरूस्ती...

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात हजारो लिटर पाणी गटारीत ; पाईपलाईन दुरूस्ती आवश्यक

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात हजारो लिटर पाणी गटारीत ; पाईपलाईन दुरस्ती आवश्यक


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जुन्या प्रवेशद्वाराने जाणा-या रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन फुटून  हजारो लिटर पाणी गटारीत जात आहे, असे असतानाही या गंभीर घटनेकडे पोलिस प्रशासनाच्या एकाही अधिकारी अथवा कर्मचा-यांचे लक्ष नाही. पाईपलाईन दुरस्ती आवश्यक असून, दुरुस्ती लवकर झाली नाहीतर अहमदनगर शहराचे हजारो लिटर पाणी गटारीत वाया जाईल, याकडे जिल्हा पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जुन्या प्रवेशद्वाराने जाणा-या रस्त्याच्या मधोमध पाण्याची पाईपलाईन अनेक दिवसांपासून फुटलेली आहे, या दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे दररोज हजारो लिटर पाणी गटारीत जाऊन अक्षरशः ते वाया जात आहे. नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस कॅन्टीन नजिक ही पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध फुटली आहे, यामुळे अधिकारी अथवा पोलिस कर्मचा-यांच्या नजरेत आली नाहीतर नवलच!. पण हजारो लिटर पाणी गटारीत जाण्याच्या या गंभीर घटनेबाबत पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. वेळीच या पाईपलाईन फुटलेल्या घटनेबाबत संबंधितांना पाईपलाईन दुरस्ती करण्यास सांगितले पाहिजे, पण याकडे दुर्लक्ष आहे.  जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे हजारो लिटर पाणी वाय जाऊ नये, यासाठी आता पोलिस प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
हे पाणी मुळाडॅम येथून  अहमदनगर शहरात आणण्यासाठी आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळेच आपल्याला स्वच्छ पाणी पिण्यास मिळते आहे. यामुळे हजारो लिटर पाणी गटारीत जाऊन अक्षरशः ते वाया जात आहे. यासाठी संबंधित ठिकाणी तात्काळ दुरुस्ती होऊन वाया जाणारे पाणी थांबवावे, यासाठी  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्यास वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments