Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकचिमुकल्या हातांनी साकारल्या लाडक्या बप्पांच्या मूर्ती....!

चिमुकल्या हातांनी साकारल्या लाडक्या बप्पांच्या मूर्ती….!

Nagar Reporter Online news Natwork

सोमराज बडे,पाथर्डी:पाथर्डी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा चिंचपूर इजदे व जि.प.प्राथमिक शाळा डोळे वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी चिंचपूर इ.शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका नम्रता सातपुते मॕडम यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती कशा प्रकारे हाताने बनवतात.,याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून गणेशमूर्ती बनवून घेतल्या.

यावेळी चिंचपूर इजदे शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती गीता खेडकर , प्रसाद भिसे सर व डोळे वस्ती शाळेचे सुनील खेडकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी चिंचपूर गावच्या सरपंच सौ. पुष्पाताई विजय मिसाळ या उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेश मूर्ती पाहून सर्व विद्यार्थ्यांचे ,शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.आणि कार्यशाळेच्या मार्गदर्शिका श्रीमती सातपुते मॅडम यांचा विशेष गौरव केला. शिक्षणयज्ञ चिंचपूर इजदे समूहाचे सदस्य पो.काॕ.अरुण मारुती मिसाळ यांनी मूर्तीकामासाठी शाडूची माती उपलब्ध करुन दिली.शुभंकरोती फाउंडेशन पाथर्डीचे प्रा.सूर्यकांत काळोखे व आनंदवन मांडवे ता.पाथर्डीचे प्रणेते संदिप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबवण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments