सोमराज बडे पाथर्डी,:अयोध्येत श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठाना होत आहे. त्यानिमित्ताने, देशभर अक्षता निमंत्रण दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील श्रीराम मंदिरात आज वार सोमवार पासून (ता.८) अक्षता वितरण अभियानास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हे अभियान १५ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे.
श्रीवामनभाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय नरोडे व ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते श्रीराम चरणी अक्षता अर्पण करून अभियानाला सुरुवात झाली. या अभियानांतर्गत प्रत्येक घरी जाऊन श्रीराम मंदिराचे छायाचित्र, निमंत्रण पत्रक आणि अक्षता स्वयंसेवक देणार आहेत. यावेळी श्री वामनभाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय नरोडे व शिक्षक ,आदींचा सत्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्धव केदार यांच्या हस्ते झाला.
यावेळी चिंचपुर पांगुळ येथील ग्रामपंचायत सदस्य विष्णू खाडे, बाळासाहेब आव्हाड, अण्णा आंबीलढगे ,देविदास राजगुरू, उद्धव केदार,जगन्नाथ बडे ,सोपान बडे ,चंद्रकांत बडे,शिवाजी बडे,पोपटराव बडे,प्रकाश बडे, तुकाराम बडे ,दगडू बडे,गणेश बडे,सोनाजी बडे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण,तरुणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीवामनभाऊ विद्यालायाचे मुख्याध्यापक नरोडे सर व शिक्षकवृद यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. रघुनाथ काशिनाथ बडे यांनी सूत्रसंचालन केले.