Monday, May 20, 2024
Homeविशेष बातम्याचिंचपूर पांगुळ ता. पाथर्डी येथे 'स्वच्छतेसाठी एक तास' हा उपक्रम...!

चिंचपूर पांगुळ ता. पाथर्डी येथे ‘स्वच्छतेसाठी एक तास’ हा उपक्रम…!

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे,पाथर्डी:केंद्र पुरस्कृत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील गावागावांत रविवारी (ता. १) ‘स्वच्छतेसाठी एक तास’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र पुरस्कृत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत चिंचपूर पांगुळ या गावामध्ये हे अभियान आज सकाळी दहा वाजता भाजप नेते धनंजय बडे यांच्या उपस्तीत उत्स्फूर्तपणे राबविण्यात आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सर्वत्र ‘एक साथ एक तास स्वच्छता’ या अभियानास उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली असून ग्रामपंचायत चिंचपूर पांगुळ व ग्रामस्थच्या वतीने,आठवडी बाजारातळ येथे रविवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे.

धनंजय बडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संपूर्ण देशात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत हे अभियान राबवले जात आहे.याचाच भाग म्हणून चिंचपुर पांगुळमध्ये ठिकठिकाणी या अभियानाचा शुभारंभ झाला आहे.

येणाऱ्या काळातही स्वच्छता अभियान आम्ही पूर्ण ताकदीने राबवू. यावेळी हनुमान मंदिर, बाजारतळ ,ग्रामपंचायत कार्यालय परिसर,बौद्ध मंदिर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर अशी दीड ते दोनतास स्वच्छता करण्यात आली.


याप्रसंगी ग्रामसेवक साळुंके, पोपटराव दशरथ बडे, विक्रम साखरे,नवनाथ खंडागळे,बाळू रंधवे,पत्रकार सोमराज बडे,दीपक शेटे, योगेश बडे,प्रकाश बडे,सोनाजी बडे,लक्ष्मण पुंजाजी बडे, अर्जुन रंधवे,बाजीराव बडे शाहादेव बडे,अर्जुन बडे,राजेंद्र सातपुते,प्रशांत बडे,गणेश प्र.बडे,गोरक्ष अंबिलढगे,विष्णू बडे,आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments