Monday, May 20, 2024
Homeक्राईमचालकाला मारहाण करून ट्रॅक्टर पळवून घेऊन जाणारी टोळीस पकडले ; नगर एलसीबी...

चालकाला मारहाण करून ट्रॅक्टर पळवून घेऊन जाणारी टोळीस पकडले ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर चालकास मारहाण करुन ट्रॅक्टर पळवून घेऊन जाणारी टोळी पकडली. त्याच्याकडून दोन ट्रॅक्टरसह ११ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख (वय ३०, रा. अंबिकानगर, कोल्हार बुाा, ता. राहाता), शकिल नजीर शेख (वय २४, रा. अंबिकानगर, कोल्हार बुाा, ता राहाता), विशाल सुनिल बर्डे (वय २६, रा. अंबिकानगर, कोल्हार बुाा, ता राहाता), अक्षय श्रीराम जमधडे (वय २०, रा. अंबिकानगर, कोल्हार बुाा, ता. राहाता), सोहेल नसीर शेख (वय २०, रा. पिंजारगल्ली बाजारतळ, कोल्हार बु ाा ता. राहाता), विवेक लक्ष्मण शिंदे (वय २६, र. टाकळीभान ता. श्रीरामपूर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे व श्रीरामपूर डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, रणजित जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाठ, उमाकांत गावडे, व अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी महांकाळवडगांव येथूnike presto boys grade school nfl jersey store shopper bag kozena camicia leggera donna hobo bags amazon اسعار كاميرات dslr mule dakota salto bloco Portugal puma nova pastel ventaglio grande amazon softball jerseys geaca jordan barbati denon dvd 1940 اسعار كاميرات dslr dá sa pandora odpocuvat kappa monokey cbr 1100 xxन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरुन घेऊन अशोकनगर साखर कारखाना श्रीरामपूर येथे जात असतांना खोकर फाटा येथे ट्रॉलीचे टायर पंचर झाल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली रोडचे कडेला उभा करुन थांबलेले होते. त्यावेळी काळे रंगाचे स्विफ्ट कारमधून चौघे अनोळखींनी येऊन काहीतरी हत्याराचा धाक दाखवून स्विफ्ट कारमध्ये बसवून ट्रॅक्टर बळजबरीने चोरुन घेऊन गेले, या घटनेच्या किशोर दत्तात्रय धिरडे (रा. भेर्डापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 75/2024 भादवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री फिर्यादी अरुण सिताराम पवार (रा. निपाणी निमगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) हे भानसहिवरे शिवारातून त्यांचा ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जात असतांना त्यांचे ट्रॅक्टरला स्विफ्ट गाडी आडवी लावुन मारहाण करुन त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर चोरुन नेला होता. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 172/2024 भादवि कलम 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वरील दोन्ही गुन्हे करण्याची पध्दत ही सारखीच असल्याने व दोन्ही गुन्हे गंभीर स्वरुपाचे असल्याने
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी टिम’ने तपास करीत अखेर लुटारू टोळीस पकडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments