Monday, May 20, 2024
Homeक्राईमकापूस व्यापाऱ्याची पैशांची बॅग चोरणा-या चोरट्यांना पकडले ; नगर एलसीबी टिम'ची कामगिरी

कापूस व्यापाऱ्याची पैशांची बॅग चोरणा-या चोरट्यांना पकडले ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथून कापूस व्यापाऱ्याची रोख रकमेची बॅग चोरी करणारे तिघांना पकडण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. अभिजीत गणपत बळी (वय २३, रा. भोकर ता. श्रीरामपूर), अंकुश दत्तात्रय बहिरट (वय २१, रा. घोगरगाव ता. नेवासा), इकबाल सिकंदर शेख (वय ३८, रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, संदीप दरंदले, रणजित जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाठ, चंद्रकांत कुसळकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
ray ban 3025 58mm polarized replacement lenses custom bball jerseys ventaglio grande amazon apple watch series 7 nike cellular 45mm Canada ray ban 3025 58mm polarized replacement lenses recinzioni a basso costo amazon γυαλια υπερμετρωπιας αθλητικα meuble sous evier 100 cm brico depot toppaliivi pitkä naiset papuci cu toc mic argintii nike internationalist summit white obsidian nike internationalist summit white obsidian bradley dolma kalem pull femme rose fushia merceditas mujer leopardo
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.७ नोव्हेंबर २०२४ रोजी जय संताजी ट्रेडिंग या नावाचे कापूस खरेदीचे दुकानासमोर बसलेले असतांना त्यांच्या जवळील ३ लाख रुपये असलेली पैशाची बॅग एकजण घेऊन जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचा पाठलाग केला. परंतु तो तेथून त्याच्या साथीदारासह दुचाकीवर बसून पळून गेला, या घटनेबाबत रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे ( रा. मालुंजा, ता. गंगापुर, जि. छ. संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६१८/२०२३ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेकामी पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेची टिम तयार करुन त्यांना सूचना देऊन रवाना केले होते. एलसीबी टिम घटना ठिकाणच्या आजुबाजुस आरोपीची सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती काढत असतांना दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीसांना गुन्हा आरोपी अभिजीत बळी (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची व ते टाकळीभान येथील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. एलसीबी टिम’ने तात्काळ टाकळीभान येथे जाऊन टाकळीभान परिसरातील हॉटेल परिसरामध्ये आरोपींची माहिती काढत असतांना हॉटेल द्वारकाजवळ तिघे संशयीतरित्या उभे असल्याचे दिसले. पोलीसांनी माहितीनुसार खात्री झाल्याने हॉटेलजवळ उभे असलेल्यांकडे जात असतांना त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागताच ते तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे अभिजीत गणपत बळी ( रा. भोकर ता. श्रीरामपूर), अंकुश दत्तात्रय बहिरट (रा. घोगरगाव ता. नेवासा), इकबाल सिकंदर शेख ( रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी तसेच त्यांचे फरार साथीदार विवेक लक्ष्मण शिंदे (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर, लखन नंदु काळे (रा. नेवासा) यांनी टाकळीभान येथील कापूस व्यापाऱ्यावर पाळत ठेवून व अंकुश बहीरट, लखन काळे यांनी शाईन दुचाकीवरुन पैशाची बॅग घेऊन पळून गेले असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचासमक्ष झडती घेता त्यांचे झडतीमध्ये रोख रक्कम, मोबाईल असा एकूण १,व लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. त्यांना श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६१८/२०२३ भादवि कलम ३७९, ३४ या गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments