Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकगणपती बप्पा मोरया..नगरला गणरायाला उत्साहात निरोप

गणपती बप्पा मोरया..नगरला गणरायाला उत्साहात निरोप

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर ः
अहमदनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मीनाक्षी सालीमठ यांच्याहस्ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे महापूजा करून दुपारी विसर्जन मिरवणुकीस सुुरुवात झाली होती. या मानाच्या विशाल गणपती मिरवणूक माळीवाडा, दाळमंडई, कापडाबाजार, नवीपेठ, चितळीरोडमार्गेे दिल्ल्लीगेटमधून गुरुवारी (दि.28) सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडली.

यावेळी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे आदी विश्‍वस्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीच्या प्रारंभी सनई चौघाड, दोन ढोल पथक सहभागी झाले होेते.यावेळी या मिरवणुकीत माळीवाडा भागातील 12 मानाचे गणपती सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणामध्ये गणरायाला निरोप देण्यात आला. अनेक मंडळाचे कार्यकर्तेे मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. या दरम्यान, मानाचा विशाल गणपतीची अनेक ठिकाणी मनोभावी पूजा व आरती केली. या दरम्यान असणार्‍या मिरवणुकीत 14 मंडळे सहभागी झाले होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments