Monday, May 20, 2024
HomeUncategorizedगंभीर गुन्ह्याच्या खटल्यात फरार असणा-यास पकडले ; कर्जत पोलिसांची कारवाई

गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात फरार असणा-यास पकडले ; कर्जत पोलिसांची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork
कर्जत –
खून, विनाभांगासारख्या तीन गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात फरार असणा-या आरोपीला कर्जत पोलिसांनी पकडला. संतोष हौसराव गोयकर (वय 33, रा खंडाळा, ता कर्जत जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, संतोष हौसराव गोयकर हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांच्या न्यायालयात वारंवार गैरहजर होता. त्यास वॉरंट काढले होते. वारंवार शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा यांच्याकडील एन बी डब्ल्यू वॉरंट विशेष खटला नंबर 27/ 2019 मध्ये भादवि कलम 354 लहान मुलांना लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा खूनाचा सत्र खटला क्रमांक 53/2019 भादविका कलम 302, कर्जत न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडील एससीसी नंबर 710/2021 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 असे गुन्हे असलेला आरोपी हा मागील सात-आठ महिन्यापासून फरार होता. गोपनीय माहिती काढून त्यास दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 12 वाजता कर्जत पोलिसांनी मिरजगाव येथून अटक केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोनि चंद्रशेखर यादव, सफौ बाळासाहेब यादव, पोकॉ दीपक कोल्हे, जालिंदर माळशखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments