Monday, May 20, 2024
Homeक्राईमकोतवाली पोलिस ठाणे : ७ महिन्यांपासून फरार असणारा आरोपीस पकडले

कोतवाली पोलिस ठाणे : ७ महिन्यांपासून फरार असणारा आरोपीस पकडले

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
जबरी चोरी करून ७ महिने फरार असणारा आरोपीस कोतवाली पोलिसांनी अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पकडला. आरोपी याने पैसे असलेली पिशवी बळजबरीने हिसकावून तो फरार झाला होता. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जावेद शेख (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सपोनि विश्वास भांसी, पोकाॅ योगेश खामकर, इस्त्राईल पठाण, योगेश भिंगारदिवे, तनवीर शेख, ए पी इनामदार, सलीम शेख, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की दि.१९ एप्रिल २०२३ दाखल गुन्ह्यातील आरोपी जावेद शेख हा गुन्हा घडल्यापासून तो फरार झालेला होता. गुन्हयाचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना माहिती मिळाली की, जावेद शेख हा त्याचे राहत्या घरी येणार आहे. त्यावरून पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेवरून सपोनि विश्वास भांसी व इतर पोलीस अंमलदारांनी त्याचे घराच्या भोवती सापळा लावून त्यास शिताफिने ताब्यात घेतले.
जावेद ताज मोहम्मेद शेख, (वय ३१, रा.न्यु हिना पार्क, ७७२, दर्गादायरा रोड, मुकुंदनगर, अहमदनगर) यास अटक केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. गुन्हयाचा अधिक तपास सपोनि विश्वास भांसी हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments