Monday, May 20, 2024
Homeक्राईमअहमदनगर एलसीबी : शिर्डीत १२ लाखांची सुगंधी तंबाखू, पानमसाला जप्त

अहमदनगर एलसीबी : शिर्डीत १२ लाखांची सुगंधी तंबाखू, पानमसाला जप्त

Nagar Reporter
Online news Natwork
शिर्डी :
येथील सुगंधी तंबाखू व पानमसाला अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणा-यास पकडले. त्याच्याकडून १२ लाख ७ हजार ४६१ रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ मनोहर गोसावी, पोना संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, पोकॉ अमृत आढाव व चापोहेकॉ संभाजी कोतकर यांच्या आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.


वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला विरुध्द कारवाया करण्यात आल्या. त्यानुसार दि‌.१ डिसेंबर २०२३ लाख एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, साजीद पठाण व आबीदखान पठाण (रा. नुराणी मज्जीद जवळ, श्रीराम नगर, शिर्डी) हे त्यांच्या राहत्या घराच्या तळ मजल्याचे खोलीत सुगंधीत तंबाखू व पानमसाला विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगून आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती एलसीबी टिम’ला सांगितली. पंचाना सोबत घेऊन खात्री करुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. एलसीबी टिम’ने दि.१ डिसेंबर २०२३ रोजी माहिती ठिकाणी जाऊन पाहणी करता एक संशयीत गोण्यामधून पुडे काढताना दिसला पोलिसांची खात्री होताच ५ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा घालून एका संशयीतास ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव साजीद साहेबखान पठाण (वय 32, रा. नुराणी मज्जीद जवळ, श्रीराम नगर, शिर्डी) असे सांगितले. संशयीत उभा असलेल्या तळ घराची झडती घेता त्यामध्ये विविध प्रकारची सुगंधी तंबाखू व गुटखा पानमसाला मिळून आला. त्याबाबत विचारपुस करता आरोपीने माल हा त्याचा भाऊ आबीदखान साहेबखान पठाण (रा. नुराणी मज्जीद जवळ, श्रीराम नगर, शिर्डी (फरार) याने आणला आहे. दोघे मिळुन विक्री करतो, अशी माहिती दिल्याने आरोपीस महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेऊन शिर्डी पोलिस ठाण्यात.गु.र.नं. १०६७/२०२३ भादविक ३२८, १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments