Monday, May 20, 2024
HomeUncategorizedकरुणा मुंडेंची 30 लाखांची फसवणूक :  ३ जणांवर गुन्हा दाखल

करुणा मुंडेंची 30 लाखांची फसवणूक :  ३ जणांवर गुन्हा दाखल

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
संगमनेर-
Karuna Munde नुकत्याच ज्या विविध कारणास्तव प्रकाश झोतात आलेल्या व नव्याने राजकीय पक्षाकडून राज्यभर फिरणा-या करुणा मुंडे यांची त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. करुणा मुंडे ( रा. सांताक्रुझ, मुंबई ) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार ( दि.२६ ) रोजी रात्री फिर्याद दिली आहे.

मुंडे यांच्या फिर्यादीत भारत संभाजी भोसले ( रा. डाबे वस्ती, कोंची, पो. निमगावजाळी, ता. संगमनेर ), विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग ( दोघेही रा. घुलेवाडी, ता. संगमनेर ) अशी फसवणूक करणा-यांची नावे आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की,  करुणा मुंडे यांना कमी वेळात जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, एका कंपनीमध्ये सुमारे 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. परंतु या सर्व घडामोडीत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत्याच त्यांनी संगमनेर  शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. भारत संभाजी भोसले ( रा. डाबे वस्ती, कोंची, पो. निमगावजाळी, ता. संगमनेर ), विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग ( दोघेही रा. घुलेवाडी, ता. संगमनेर ) अशी फसवणूक करणा-यांची आरोपींची नावे आहेत.
करुणा मुंडे यांनी फिर्यादीत म्हटले की, संगमनेर येथील भारत संभाजी भोसले, विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग या तिघांनी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या ओळखीतून करुणा मुंडे यांचा विश्‍वास संपादन केला. यानंतर लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीबाबत माहिती दिली. या कंपनीत ३०लाख रुपयांची आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा ४५ ते ७० हजार रुपये अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवले.  यापेक्षा अधिक प्रमाणात नफा मिळाल्यास त्या प्रमाणात अधिक नफा देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या म्हणण्याला भुलून करुणा मुंडे यांनी ७ जानेवारी २०२२ पासून १० दिवसांत रोख व धनादेशाच्या स्वरुपात त्यांना ३० लाख रुपये दिले. गुंतवणूक केल्यानंतरही तिघांनी कोणतीही अधिक माहिती व नफा न देता फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची खात्री पटावी यासाठी ४५ हजार रुपये परतावा दिला. यानंतर त्यांनी फोन न घेणे, विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देणे असे प्रकार सुरु झाला. करुणा मुंडे यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व समाजात बदनामी कऱण्याची धमकी दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच करुणा मुंडे यांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले.  तिघांविरुध्द पुराव्यांसह फिर्याद दिली. करुणा मुंडे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments