Saturday, April 27, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकएकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ येथे वार्षिक बक्षीस वितरण...

एकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ येथे वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…!

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,पाथर्डी:
तालुक्यातील एकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ येथे आज दिनांक २७ मार्च रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती पाथर्डी शिक्षण विस्तार अधिकारी तथा पाथर्डी तहसीलदार कार्यालय नोडल अधिकारी रामनाथ कराड हे विराजमान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिंचपूर पांगुळचे शाखाधिकारी राजीव कुमार व केंद्र प्रमुख उद्धव बडे हे उपस्थित होते. तर ग्रा.प.सदस्य विष्णू खाडे,आनंद रंधवे,रावसाहेब बडे,सुनील खेडकर,जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक सापते,शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष गणेश बडे,पत्रकार सोमराज बडे,सौ.मीरा बडे,श्रीम.वैशाली आघाव,बाबासाहेब उदमले,एकनाथ  सारूक हे या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने सुरुवात झाली या प्रसंगी स्वागतगीत विद्यालयाच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी सादर केले, या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नरोडे यांनी वर्षभराचा लेखा-जोखा प्रास्ताविकेतून प्रकट केला.सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,क्रिडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,सुदंर हस्ताक्षर स्पर्धा,विविध कला स्पर्धा,पार पडल्या होत्या,ह्या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले होते अश्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी बक्षिस समारंभाचे आयोजन केले होते. तर इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्याचा देखील गौरव या प्रसंगीं करण्यात आला. “विद्यार्थी” आपले” दैवत “असून तो केंद्रबिंदू ठेऊनच आपण त्याचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे” असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष रामनाथ कराड यांनी केले.या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती असलेली महत्वकांक्षा व येथील सर्वच शिक्षकांची तळमळ पाहून आपण भारावून गेलो आहोत.विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आगामी काळात आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असे मनोगत देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाखाधिकारी श्री राजीव कुमार यांनी बोलतांना सांगितले की शिक्षणाशिवाय माणूस एकवेळ आमदार,खासदार,प्रधानमंत्री बनू शकतो,परंतु तहसीलदार,जिल्हाधिकारी,होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या पदावर काम करण्याचे स्वप्न ठेऊन चांगल्या दर्जाचे मन लावून शिक्षण घेतले पाहिजे.शिक्षणाशिवाय माणूस ताठ मानेने जगू शकत नाही. म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी होईल तेवढे ,जमेल तसे,दर्जेदार शिक्षण घ्यावे.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मुख्याध्यापक श्री संजय नरोडे,घुले,जाधव,बांगर,ढाकणे,गर्जे मॅडम,अकोलकर,डॉ.संजय उदमले,दहिफळे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले .सूत्रसंचालन सनी मर्दाने यांनी तर आभार डॉ.संजय उदमले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थांचे कौतुक याप्रसंगी मान्यवरांनी केले आहे.

मतदार जागृती…!

त्याचप्रमाणे यावेळी श्री वामनभाऊ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती करण्याच्या उद्देशाने शाळेत रांगोळीचे सुदंर असे वेगवेगळ्या प्रकारचे रेखाटन केले होते,तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढण्यात आलेली प्रभात फेरी,तसेच रांगोळी व विविध प्रकारचे संदेश लिहिलेले चित्र प्रदर्शन भरवले होते.प्रांताधिकारी प्रसाद मते,व तहसीलदार डॉ.उद्धव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव केंद्र अंतर्गत मतदार जागृती पंचायत समिती पाथर्डी शिक्षण विस्तार अधिकारी तथा पाथर्डी तहसीलदार कार्यालय नोडल अधिकारी रामनाथ कराड व केंद्रप्रमुख उद्धव बडे,यांनी यावेळी पहाणी करत मतदान जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना मतदार जागृती करण्यास मदत केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी त्यांनी सांगितले की सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदानाची घसरलेली टक्केवारी वाढण्यास मदत करावी.यासाठी आपल्या शेजारी,मित्र,आई-वडील यांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे असे अवाहन करून.यासाठी आम्ही सर्व जण मिळून मतदानाची आगामी लोकसभा निवडणुकीत टक्केवारी वाढी साठी प्रयत्न करत आहोत.स्वीप सहाय्यक मतदार समन्वयक सुनील खेडकर,आजिनाथ पालवे, कमलेश केदार, भारत गाडेकर, सचिन साळवे, प्रवीण खंडागळे, हे यावेळी उपस्थित होते.

तसेच निपुण भारत अंतर्गत पिंपळगाव टप्पा केंद्रातील शाळेमध्ये निपुण उत्साह केंद्राचा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक स्टॉल लावले होते,नवीन शैक्षणिक भाषा व गणित या विषयांचे साहित्य तयार केले होते. गावातील मोठ्या संख्येने पालक निपून भारत अंतर्गत कार्यक्रमात व मतदार जागृती मध्ये सहभागी झाले होते.
यावेळी मुख्याध्यापक भास्करराव दराडे ,शाळेचे शिक्षक,ग्रामस्त उपस्तीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments