Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअ.नगरला दारुगोळा,स्फोटक पदार्थ अवैधरित्या कब्जात बाळगणा-यास‌ पकडले

अ.नगरला दारुगोळा,स्फोटक पदार्थ अवैधरित्या कब्जात बाळगणा-यास‌ पकडले

👉अहमदनगर एलसीबी व पुणे सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स यांची संयुक्त कारवाई
Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खारेकर्जुने या‌ ठिकाणी भारतीय सैन्य दलाचे दृष्टीने संवेदनशिल असणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थ अवैधरित्या कब्जात बाळगणा-यास‌ ताब्यात घेण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी व पुणे सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स यांनी संयुक्त केली. दिनकर त्रिंबक शेळके (वय ६५, रा. कर्जुनेखारे, ता. नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे पोसई सोपान गोरे, पोहेकॉ देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, तसेच पोसई चांगदेव हंडाळ, पोहेकॉ आसाराम मुटकेळे, संजय येठेकर, तवार, पोना महादेव गरड, पळसकर, पोकॉ सुरेश सानप, सी. बी. खेडकर, बाबासाहेब काळे, ए. एस. कांबळे, सदन कमान मिलिट्री इंटेलिजेन्स, पुणे येथील पोलीस अधिकारी, दहशदवाद विरोधी शाखा, अहमदनगर, बीडीडीएस पथक व एमआयडीसी पोलीस टिमने कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२१ जुलै ला अहमदनगर एसपी राकेश ओला यांना माहिती मिळाली की, खारे कर्जुने ( ता. नगर) येथील दिनकर भोसले हा त्यांच्या राहत्या घरी भारतीय सैन्य दलात वापरला जाणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थ अवैधरित्या कब्जता बाळगतो आता गेल्यास मिळून येईल. अहमदनगर जिल्हा हा सैन्य दलाचे दृष्टीने अतिशय महत्वाचा व संवेदनशिल असल्याने अशा प्रकारे कोणी सैन्य दलातील दारुगोळा अवैधरित्या कब्जात बाळगून घातपात करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ही घटना निदर्शनास आल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन एसपी श्री. राकेश ओला यांनी पोनि श्री. आहेर तसेच सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभाग पुणे येथील अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा अहमदनगर, बीडीडीएस अहमदनगर व एमआयडीसी पोलीस अधिकारी, अंमलदार व पंचाना बरोबर घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. कारवाईसाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार टिमने खारेकर्जुने येथे जाऊन संशयीत दिनकर शेळके यांचे वास्तव्याबाबत माहिती घेतली. त्यावेळी संशयीताचे घराबाहेर एकजण उभा असलेला दिसला. टिमने ७.१७ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकून उभा असलेल्यास ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सांगितले.

त्याच्याकडे भारतीय सैन्य दलात वापरला जाणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थाबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने राहत्या घरासमोरील पत्र्याचे शेडमध्ये आडगळीच्या सामानाखाली दारुगोळा, स्फोटक पदार्थ व साधने ठेवलेली आहेत. यात १८ टॅन्क राऊंड, ५ मोटार राऊंड, ८ ऍ़म्युनेशन पिस्टल राऊंड, १६ पिस्टल राऊंड, ४० स्विचेस, लाल पिंवळी वायर बंडल व २५ किलो टीएनटी पावडर असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६४९/२०२३ स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ४ व भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments