Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाअहमदनगर येथे कल्पतरू इ. मोटर्स सर्विस सेंटरचा शुभारंभ

अहमदनगर येथे कल्पतरू इ. मोटर्स सर्विस सेंटरचा शुभारंभ

नगर शहर व्यावसायी करणाचे केंद्र बनू लागले : आ.संग्राम जगताप

नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क / व्हिडिओ
अहमदनगर –
शहरामध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली असल्यामुळे नागरी वसाहती दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे नामवंत ब्रँड कंपनीचे दालने शहरांमध्ये येत आहे. पुना मुंबईला खरेदीसाठी जाण्याची गरज पडत नाही. आता नगर शहरातच सर्व गोष्टी मिळू लागल्या आहेत. कल्पतरू इ मोटर्स या ब्रँड ने नगर शहरातील नागरिकांना दुचाकी वाहनांची दुरुस्ती ची सेवा सुरू केले आहे. या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ग्राहकांच्या उत्तम सेवेतून विश्वास संपादित केला जातो असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

तपोवन रोड कजबे वस्ती येथे कल्पतरू इ मोटर्स सर्विसिंग सेंटरचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी, आमदार निलेश लंके,नगरसेवक दिपाली बारस्कर, नगरसेवक संपत बारस्कर,नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक बाळासाहेब पवार,सचिन जगताप, साहेबराव कजबे,बबन तागड,अर्जुन कजबे, राजू तागड, अनिल ढवन, बाळासाहेब बारस्कर,किसन कजबे बाळासाहेब कजबे,संजय भोजने,भीमराज कजबे,कृष्णा कजबे,गणेश केदारी,शरद पाचारणे दालनाचे संचालक युवराज कजबे,मार्केटिंग मॅनेजर मोहम्मद रफीक मुल्ला. आदी उपस्थित होते.


यावेळी सर्विस सेंटर चे संचालक युवराज कजबे म्हणाले की, नगर शहरांमध्ये कल्पतरू इ मोटर्स दुचाकी सर्विसिंग सेंटरचा शुभारंभ झाला आहे. दुजाकी वाहनांच्या दुरुस्तीसाठी ऑनलाइन सर्विसेस बुकिंग, दुचाकी सर्विसिंगची घरपोच सेवा दिली जाणार आहे, दुचाकी वाहनाची दुरुस्ती खात्रीदायक केली जाणार आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करने हाच आमचा मुख्य उद्देश आहे. यांसह विविध सेवा उपलब्ध असून ९९ रुपयांपासून दुचाकी वाहनांची सर्विसिंग या स्मार्ट गॅरेज मध्ये उपलब्ध असणार आहे. कल्पतरू इ मोटर्स सर्विस सेंटर हे अल्पवधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करील असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments