Monday, May 20, 2024
HomeUncategorizedअवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्यावर नगर तालुका पोलिसांचा छापा

अवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्यावर नगर तालुका पोलिसांचा छापा


नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर-
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे अवैध देशी- विदेशी दारू विक्रेत्यावर छापा टाकून १३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.


गुंडेगाव (ता. नगर) येथे अवैध देशी विदेशी दारुविक्रेता विशाल पिंपरकर हा त्याचे साईराम नाश्ता सेंटर गुंडेगाववर अवैध दारू विक्री करत असलेची बातमी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी दिलेल्या सूचनेनुसार एएसआय दिनकर घोरपडे, पोहेकाॅ सोनवणे, पोना बांगर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
छाप्यात देशी दारू 96 बाटल्या, टुबर्ग बियर 12 ,इंपिरियल ब्ल्यू 36 बाटल्या अशा एकूण 13380 रू किमतीची 144 बाटल्या दारू असा मुद्देमाल नगर तालुका पोलीसांनी जप्त केला आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments